सामाजिक उपक्रमांची दखल 'मन की बात' कार्यक्रमात घेतली जाते - बबनराव चौधरी* समाज सुधारक शाहू महाराज एक आदर्श नेता होते- आ. काशिराम पावरा



 शिरपूर : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या लोकप्रिय उपक्रमांपैकी मन की बातचा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित करण्यात येत असतो प्रधानमंत्री मन की बातच्या माध्यमातून देशवासीयांसोबत संवाद साधत असतात या मन की बातच्या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी शिरपूरच्या वतीने दि.२६ जुन रोजी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र संयोजक बबनराव चौधरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. तसेच यावेळी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती निमित्त आ. काशिराम पावरा यांचा हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. शिरपूर शहरातील बबनराव चौधरी यांचा संपर्क कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते तसेच बैठक हि घेण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र संयोजक बबनराव चौधरी यांनी सांगितले की मन की बातचा कार्यक्रमात सामाजिक उपक्रमांची दखल घेणारे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचा अत्यंत लोकप्रिय व उच्चस्तरीय कार्यक्रम असून सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आ. काशिराम पावरा म्हणाले की, समाज सुधारक शाहू महाराज एक आदर्श नेता आणि सक्षम व्यक्ती होते राज्याभिषेकापासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी आपल्या राज्यात सर्वच जातीच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. सर्व जाती-धर्मांकडे लक्ष देवुन प्राथमिक शिक्षण ही त्याची सर्वात महत्वाची प्राथमिकता होती. बहुजन समाज सुशिक्षित झाल्या शिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. त्यांच्या मागासलेपणाचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव होय ही गोष्ट शाहू महाराजांनी ओळखून बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले होते असे सांगितले. सदर कार्यक्रमात धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जेष्ठ नेते एन. डी. पाटील, खंडेराव बाबा संस्थान उपाध्यक्ष संजय आसापुरे, मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, शिरपूर भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, मन की बात शहर संयोजक रविंद्र भोई, रमेश चौधरी, नंदु माळी, शिवम सोनार, कुणाल माळी, स्वप्निल पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने