पुणे:विधानपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी निवड झाली तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी निवड झाली या निवडीनिमित्त राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.24 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस देवकाते व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती मदनवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने त्यांचे भिगवण येथे जोरदार स्वागत करून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी पराग जाधव,संपत बंडगर,मारुती वनवे, संजय देहाडे,महेंद्र रेडके,दिनेश मारणे, राजेंद्र जमदाडे, माऊली मारकड,अशोक शिंदे ,गजानन वाकसे,माऊली वाघमोडे ,आकाश कांबळे तसेच मदनवाडी, तक्रारवाडी, भिगवण येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
