शिरपूर - आज दिनांक 30/06/2022 रोजी दुपारी 12 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले.
किसान सभे तर्फे 26/02/2022 रोजी सांगवी ते धुळे 80 किलो मिटर .पायी मोर्चा जिल्हाधिकाऱी कार्यालय वर काढण्यात आला होता.त्या मोर्चाची दखल घेण्यात आली होती.व युध्द पातळीवर वनजमीन चा जे फार्म साठी उपविभागीय अधिकारी व वन विभाग जोमात काम करत असतांना. आमदार काशीराम पावरा याचां हस्ते जे फार्म चे वाटप होईल. तसे आदेश देण्यात आले होते.
असे असताना पायी मोर्चा किसान सभेने काढायचा. मात्र या यशाचे श्रेय आमदारांनी घेण्यासाठी जे फार्म चे वाटप थांबवले. त्यामुळेच किसान सभेने दिनांक-29/06/2022 रोजी.
धुळे जिल्हा किसान सभेने तातडीची मिटींग सांगवी कार्यालयात घेण्यात आली.या गोष्टीची पडताळणी करण्यासाठीच आपसिग चतरसिग पावरा,नरसिंग संत्रया पावरा यांचा अर्ज जे फार्म मागणीचा किसान सभेचा राज्य अध्यक्ष, हिरालाल परदेशी,जिल्हा अध्यक्ष डाॅ .किशोर सुर्यवंशी तालुकाध्यक्ष सतिलाल पावरा,अडॅ.संतोष पाटील, रामचंद्र पावरा,विलास पावरा गुलाब पावरा,ई कार्यकर्तेनी आर.एफ.ओ.
स्वाती गंभिरे यांच्याकडून जे फार्म ची मागणी करण्यात आली.त्यावेळेस आर.एफ.ओ.ने सागितले,कि,जे फार्म चे वाटप आमदार काशीराम पावरा हेच करतील. त्यावेळेस किसान सभेचे शिष्टमंडळ संतापले, तेव्हा तीन शेतकऱ्यांकाना 1जुलै रोजी देण्याचे कबूल केले आहे.
आमदार काशीराम पावरा व वन विभाग चा जे फार्म लाभार्थ्याना न देण्याचा निर्णया विरुद्ध आजचे धरणे आंदोलन करण्यात आले.तसे निवेदन देण्यात आले. जे फार्म वाटप करण्याचे आदेश वनविभागातील अधिकारीना उपविभागीय अधिकारी भामरे साहेबांनी दिलेले आहेत.
म्हणून आजचे किसान सभेचा आंदोलन यशस्वी झालेले आहे.
या आंदोलनात.किसान सभेचा राज्य अध्यक्ष अडॅ. हिरालाल परदेशी,जिल्हा अध्यक्ष, डाॅ.किशोर सुर्यवंशी,तालुकाध्यक्ष सतीलाल पावरा,अंडॅ मदन परदेशी,अडॅ,संतोष पाटील, अर्जुन कोळी,रामचंद्र पावरा,भिसन पावरा,योगेश पावरा,वसत पाटील, गुमान पावरा,जितेंद्र देवरे,गुमान पावरा,बापु खैरनार, जे फार्म चे लाभार्थी आपसिग चतरसिग पावरा,नारसिग संत्रया पावरा उपस्थित होते.
उद्या शेतकरी गौरव दिवशीच सांगवी रेंज मधुन वरील लाभार्थीना जे फार्म वाटप होईल. हा किसान सभेचा पायी मोर्चाचा यश पदरात पडणार आहे. जे फार्म मिळणारे लाभार्थी शेतकऱ्यांची सांगवी रेज ते किसान सभा कार्यालय पावेतो विजयी मिरवणूक काढून .विजयी सभा घेतली जाणार आहे.
तरी वनजमीन धारक शेतकऱ्यांनी ठीक 1 वाजता किसान सभा कार्यालयात उपस्थित राहावे हि विनंती.
अडॅ.हिरालाल परदेशी राज्य अध्यक्ष
डॉ.किशोर सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष
सतिलाल पावरा तालुकाध्यक्ष
किसान सभेचे सर्व कार्यकर्ते.
