रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं. कारण आपण डोनेट केलेल्या रक्तामुळे एकापेक्षा जास्त गरजू रुग्णांचे जीव वाचू शकतात.या पार्श्वभूमीवर प्रत्येक सुजाण नागरिकाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने रक्तदान करण्यास पुढे यावे.कारण हे पुण्यकर्म देखील आहे.
मित्रहो,एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की, ब्लड कॅन्सर अन् अन्य दुर्भर आजारांच्या रुग्णांसाठी आपले दिलेले रक्त त्यांना *संजीवनी* ठरू शकते.इतकेच नव्हे तर,त्यातून त्यांना नवजीवनाची उमेद निर्माण होऊ शकते.रक्तदान केल्याने शरीराची कुठल्याही प्रकारची हानी होत नसते किंवा आपल्या शरीरातील रक्तसाठा कमी होत नसतो.उलट काही तासात आपल्या शरीरात नव्याने रक्त निर्मिती होऊन *जैसे थे* परिस्थिती तयार होते.
पहा आपल्या डोळ्यांनी...मंगेश चिवटे यांनी आत्तापर्यंत ३३ वेळा रक्त दान केलं आहे. तरी देखील ते ठणठणीत आहेत. याचं कारण म्हणजे त्यांनी इतक्या वेळा पुण्य कर्म केल्याने,त्यांना भगवंताने सुदृढ व निरोगी जीवन बहाल केलं आहे.चला तर,आपण देखील चिवटेसरांच्या पाऊल खुणांनी वाटचाल करूया,अन् पुण्यकर्म करून भगवंताकडून सुदृढ जीवनासाठी आशिर्वाद प्राप्त करूया.
चला तर,आपण सर्वजण रक्तदान करूया अन् आणखी एका पुण्यकर्माची भर आपल्या जीवनात टाकूया!💐🩺🚩🏹🙏.....✍️पत्रकार रणवीर राजपूत,ठाणे
Tags
news
