महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या व इतर विविध पदांसाठी झालेल्या निवडणुकीत शिरपूर तालुक्यात युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी गेंद्या पावरा यांची निवड झाली आहे.
युवकांच्या संघटनासाठी लोकशाही पद्धतीने युवक काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२१ या कालावधीत विथ आयवायसी या मोबाईल ऍपद्वारे प्रत्यक्षरित्या ओनलाइन मतदान घेण्यात आले होते. यात १८ ते ३५ वयोगटातील मतदारांनी मतदान केले होते. लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत शिरपूर तालुक्यात गेंद्या पावरा यांनी एकूण २०८३ मते घेऊन तालुका अध्यक्ष पद मिळविले. दरम्यान गेंद्या पावरा यांनी शिरपूर तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस (ग्रामीण) पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.
या निवडीबद्दल कुणाल पाटील, आमदार धुळे ग्रामीण तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी, रंजित पावरा सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, शामकांत सनेर जिल्हाध्यक्ष धुळे, मनोहर पाटील तालुकाध्यक्ष शिरपूर, उत्तम माळी शहराध्यक्ष शिरपूर, अभिमन्यू भोई, जिल्हा उपाध्यक्ष धुळे, विजू नाना शिरपूर, मोहन पाटील, प्रकाश जमादार, चंपालाल पावरा, वसंत पावरा बोराडि, ईश्वर मोरे लौकी, साहेबराव पावरा हिंगोणीपाडा, अरविंद पावरा हातेड, दिनेश पावरा हेदऱ्यापाडा यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान सोशल मिडीयावर काल सायंकाळपासूनच शुभेच्छांचा महापूर वाहत होता.
Tags
news
