दोंडाईचात आ.जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी भव्य मोर्चा* दोडाईचा (अख्तर शाह)



दोंडाईचा: ओबीसी, भटक्या विमुक्त समाजांचे आरक्षण, मराठा समाजाचे आरक्षण, शेतकऱ्यांचे वीज जोडणी जुलमी पध्दतीने कापल्याच्या निषेधार्थ, दोंडाईचा शहरातील व्यापाऱ्यांना दंडाच्या सक्तीच्या नोटीसा पाठवून कारवाई सुरू केल्याच्या निषेधार्थ अश्या अनेक मागण्यांसाठी माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिंदखेडा तालुक्याच्या वतीने दोंडाईचात तहसील कार्यालवर विराट मोर्चा काढून अप्पर तहसीलदार तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 
     यावेळी भाजपाचे माजी गटनेते कामराज निकम, भाजपाचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रा. आर जी खैरनार, दोंडाईचा शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, माजी उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये, जि प सदस्य डी आर पाटील, विरेंद्र गिरासे, पंकज कदम, धनंजय मंगळे, पंचायत समिती माजी सभापती रघुवीर बागल,  जिजाबराव सोनवणे, नरेंद्रकुमार गिरासे, सभापती भरत पवार, उपसभापती राजेश पाटील, नगरसेवक चिरंजीव चौधरी, विजय मराठे, जितेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर, नरेंद्र कोळी, नरेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, इस्माईल पिंजारी, नथा पाटील, सिध्दार्थ सिसोदे, व्यापारी असोसिएशनचे राकेश अग्रवाल, संजय अग्रवाल, रमेश पारख, श्रीकांत श्रॉफ, जयकुमार चैनानी, पंकज चौधरी, राजू धनगर, शैलेश बोरसे, चंद्रकला सिसोदिया, विरेंद्र गिरासे, हरेश आव्हाड, पंचायत समिती सदस्य दुल्लभ सोनवणे, प्रकाश बोरसे, रणजित गिरासे, राजेंद्र कोळी, दीपक मोरे,  साहेबराव गोसावी यांच्या भाजपाचे विविध गावांचे सरपंच, बाजार समिती संचालक, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
    यावेळी उपस्थित जनसमुदाय संबोधित करतांना आ. रावल म्हणाले की, राज्यातील सध्याचे शासन ना ओबीसी समाजाला, ना भटक्या समाजाला ना शेतकऱ्यांना, नाही व्यापाऱ्यांना कुणालाही न्याय देवू शकत नाही याउलट शेतकऱ्यांकडून बळजबरीने वसुली सुरू आहे वीजबिल भरले नाहीतर वीज कनेक्शन तोडण्याचे काम महावितरण कडून सुरू आहे शेतकऱ्यांकडून असे जुलमी वसुली याआधी कधीही झाली नाही ती आता सुरू आहे, शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडण्याचे महापाप हे सरकार करत आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पिक या नतद्रष्ट सरकारमुळे अक्षरशः जळत आहे. हे सरकार आल्यापासून पिकांच्या नुकसानभरपाई दिली गेली नाही, पिकविमा मिळत नाही, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये दिले गेले नाहीत. या शेतकऱ्यांच्या मागण्या सोडून त्यांच्याकडूनच वसुली केली जात आहे. तसेच दोंडाईचा शहरातील व्यापाऱ्यांना सक्तीच्या नोटीसा पाठवून महसूल विभागाकडून अव्वाच्या सव्वा दंडात्मक कारवाई सुरू आहे. हे सरकार समाजाच्या कोणत्याही वर्गाच्या हिताचे नसून हे फक्त महवसुली करण्यातच गुंग आहे. यांचा पापाचा घडा भरला असून एवढे पाप हे सरकार कुठे फेडणार असल्याचा संतप्त सवाल आ. रावल यांनी केला आहे.

*महवितरण अधिकाऱ्यांवर आ. रावल व शेतकऱ्यांचा रोष..* 

  या वर्षी शेतकऱ्यांचे खरीप पिक काहीही आलेले नसल्याने रब्बी पिकावर शेतकऱ्यांची मोठी आशा होती, परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरण शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीज कनेक्शन कापत आहे, सक्तीच्या वीज बिल वसुली करणाऱ्या  महावितरण विरूध्द शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे तसेच वेळेवर डीपी बदलविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाई या प्रश्नांमुळे शेतकरी हैराण झाला असून निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना आ. रावल यांनी जाब विचारला यावेळी शेतकऱ्यांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने