पत्नीचे अगोदर एक लग्न झाले आहे हे समजताच युवकांने केली आत्महत्या प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे: दौंड तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे लग्न केलेल्या युवकाला आपल्या पत्नीचे या आधी पहिले लग्न झाले आहे याची कल्पना देण्यात आली नाही. मात्र त्याला ही माहिती समजल्यानंतर त्याचा छळ सुरु करण्यात आला आणि अखेर वैतागून त्याने आत्महत्या केली. दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावात ही घटना घडली असून पत्नीने आणि तिच्या घरच्यांनी पहिले लग्न झाल्याचे लपवले तसेच पैशाची मागणी करत त्रास दिल्याने पतीने विषारी औषध प्राशन केले.

उपलब्ध माहितीनुसार , प्रशांत शेळके असं आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव असून मृत्यपूर्वी त्याने विषारी औषध प्यायल्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये तयार केला आहे. औषध प्राशन केल्यानंतर प्रशांत याचा पंधरा दिवसांनंतर मृत्यूशी झुंज दिल्यावर अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर यवत पोलिसांनी पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पत्नी भाग्यश्री पिसे, सासू स्वाती दत्तात्रय पिसे, सासरे दत्तात्रय विठ्ठल पिसे, प्रदीप भिवा नेवसे असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तिंची नावे असल्याचे समजते.

प्रशांत शेळके याचे भाग्यश्री पिसे हिच्याशी लग्न झाले होते मात्र भाग्यश्री हिने पहिले लग्न झालेले असताना ते लपवून ठेवून प्रशांतबरोबर दुसरे लग्न केले आणि लग्न झाल्यानंतर त्यास वेळोवेळी पैशाची मागणी करून त्रास दिला. पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींकडून होत असलेल्या या त्रासाला कंटाळून प्रशांतनं 14 फेब्रुवारी 2022 रोजी बोरीपार्धी गावचे हद्दीतील बोरमलनाथ मंदीराचे परिसरात औषध घेतले.

औषध प्राशन केल्याने प्रशांत यास पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 14 दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. प्रशांत याचे वडील संपत विठ्ठल शेळके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पत्नी, सासू, सासऱ्यासह एकाविरुध्द आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने