आदरणिय कृतिकाबेन भुपेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीमती कुक्कुबेन पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा.आ.केंद्र रोहिणि येथे विविध उपक्रम राबवित महिलादिन साजरा झाला.
प्रथमसत्राचे उद्घाटन मा.जिल्हापरिषद सदस्य श्री कैलासभाऊ पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम सत्रात उपस्थितीत आशास्वयंमसेवक व आरोग्य सेविका यांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवला.श्रीमती कल्याणि देशमुख यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर उपकेंद्र दहिवद यांनी द्वितीय तर उपकेंद्र रोहिणि यांना तृतिय क्रमांकाचे बक्षिस प्राप्त झाले.
श्री तुषार शिवणेकर यांनी सर्व उपस्थितांना योग काळाची गरज यावर विषयी मार्गदर्शन करीत सर्वांकडून योगासन करुन घेतले.
दुसर्या सत्रात श्रीमती स्मिता पाटिल विषय शिक्षक भोइटी तसेच वंदना पाटिल मुख्याध्यापिका जि.प शाळा भोईटी यांनी महिलादिन का साजरा करतात व कर्तृत्ववान महिलांचा इतिहास मांडला.श्रीमती अहिरे मॅडम भोईटी शाळा यांनी आजची स्त्री या विषयांवर मनोगत व्यक्त केले.
याच सत्रात प्रा.आ.केंद्र रोहिणि तर्फे मुलींची व महिलांची रक्तगट चाचणी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले होते.आज एकुण 90 मुलींची रक्तगट तपासणी करण्यात आली.डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांनी रक्तगट तपासणी का गरजेची आहे याचे सखोल मार्गदर्शन केले.
तिसर्या सत्रात श्रीमती पोर्णिमा पाठक यांनी आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांचे समाजातील महत्वाचे योगदान,ग्रामीण भागात राबविण्यात येणारी परसबाग संकल्पना तसेच प्लास्टिक मुक्ति अभियान या विषयावर मार्गदर्शन केले.तद्नंतर डाॅ.सुप्रिया पंतवैद्य याना स्त्रियांचे आरोग्य व रक्तगट तपासणीचे फायदे सांगितले.त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता व घ्यावयाची काळजी तसेच भुपेशभाई पटेल ट्रस्ट च्या वतिने महिलांसाठी राबविलेल्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ही केले.
लुपिन फाऊंडेशन धुळे च्या वतिने उपस्थितीत सर्व आशास्वयंमसेवक व महिला कर्मचारीवर्ग यांनी उन्हापासून संरक्षण व्हावे या करिता स्कार्फ देण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती कृतिकाबेन पटेल व श्रीमती कुक्कुबेन पटेल यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आलेत.
तालुका आरोग्य पथक व प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या वतिने सर्व आशास्वयंमसेवक यांना केलेल्या आरोग्य सेवेबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले.
आजच्या महिलादिन कार्यक्रमाच्या विशेष नियोजनाबद्दल व प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या कामकाजाबद्दल प्रमुख पाहुणे यांनी वैद्यकीय अधिकारी डाॅ.राष्ट्रपाल अहिरे,डाॅ.सुनिल पावरा व डाॅ.प्रितम माळी यांना शुभेच्छा दिल्यात.
प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या सर्व आरोग्य सेवक व आरोग्य सेविका तसेच श्रीमती शिंदे सिस्टर,श्री संतोष देशपांडे, आधार सपकाळे,अनिल मराठे,अनिल बंजारा ,कासम पिंजारी, यांनी स्वेच्छेनेच आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले .
Tags
news
