दोंडाईचा शहर भाजपा महिला आघाडीतर्फे महिला दिनानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार जयकुमार रावल प्रमुख पाहुणेपदी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुम निकम , महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे ,भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सविता पगारे ,बचत गटाच्या समन्वयक इंन्टेरीअर पुजा . खडसे ,
वैद्यकीय अधिकारी डॉ युतिका भामरे ,भाजपा दोंडाईचा शहराध्यक्ष प्रविण महाजन , मा.उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये ,मा. पाणीपुरवठा सभापती वैशाली महाजन ,मा. आरोग्य सभापती मनिषा जितेंद्र गिरासे ,मा.शिक्षण सभापती सुफीयान तडवी , शहराध्यक्ष महिला आघाडी दोंडाईचा प्रा.ईशरतबानु शेख , आत्मनिर्भर भारताच्या जिल्हाध्यक्ष राखी उपाध्ये इ.मान्यवर उपस्थित होते.
आ.जयकुमार रावल यांनी बोलतांना सांगितले की अमेरीकेत लोकशीहीची स्थापना होऊन ३०० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरीदेखील महिलांना आपल्या हक्कासाठी लढावे लागले त्यांनी मतदानासाठी , सार्वजनिक वाहतूकमध्ये आसनासांठी मोठे आंदोलन उभारल्याची इतिहासात नोंद आहे त्याउलट भारतात लोकशाही स्थापन होऊन ७५ वर्षांपेक्षा कमी काळ झाला आहे तरीदेखील भारताच्या महिला सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहेत आज भारतीय महिला देशाच्या सुरक्षा सिमेवर देखील गस्त घालण्यास सज्ज झाल्या आहेत म्हणुन भारताच्या प्रगतीत महिलांचे सारखे योगदान आहे असे गौरवोद्गार काढले.
सविता पगारे यांनी महिलांसाठी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली .धरती देवरे यांनी महिलांना प्रगतीची समान संधी असुन शिक्षणामुळे महिलांना सन्मान प्राप्त होत असल्याचे सांगितले .पुजा खडसे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण केल्याचे सांगितले .
कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या त्यात माझी मुलगी माझा अभिमान ,३० सेकंदात विविध महिलांसोबत जास्तीत जास्त सेल्फी ,कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या डॉ अर्चना पाटील ,पोलीस काँन्स्टेबल पुजा पाडवी व नेटसेट मध्ये यश मिळवलेल्या दिपश्री प्रकाश अहिरराव व वृषाली चेतन निकम यांचा सन्मान करण्यात आला .
कार्यक्राचे सुत्रसंचलन सुवर्णा कुचेरीया ,ज्योत्स्ना पवार ,प्रिती पाठक यांनी आभारप्रदर्शन रोहिणी पाटील यांनी केले कार्यक्रमात विविध स्पर्धांचे परिक्षण कुमुद अग्रवाल ,टिना उपाध्ये ,वैशाली महाजन ,मनिषा गिरासे ,इंदीरा रावल ,जयश्री अहिरराव व मनिषा गुजराथी इ मान्यवरांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.ईशरतबानु शेख ,राखी उपाध्ये ,सुवर्णा कुचेरीया ,टिना उपाध्ये , रोहिणी पाटील,कुमुद अग्रवाल ,मनिषा निकम ,प्रिती पाठक ,मनिषा गुजराथी ,गायत्री उपाध्ये ,ईशा गुप्ता , शाहिन शेख इ महिलांनी प्रयत्न केले.
Tags
news
