हनुमान सेनेकडून रक्तदान करून महिला दिन साजरा.* प्रतिनिधी- जीवनसिंग राजपूत



मलकापूर 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला महिलांच्या योगदानाची तपश्चर्याची आणि त्यागाची आठवण करून देतोच पण महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन एक खास थीमवर साजरा केला जातो अशा परिस्थितीत हा दिवस खास बनवण्यासाठी भूमिकाताई देवेंश दंड यांनी हनुमान सेनेच्या माध्यमातून रक्त दान करण्याचा निर्णय घेतला  ही संकल्पना महिलांनी पुढे  जोपासावी तसेच महिला दिनाच्या निमित्ताने अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांचा दिवस साजरा करणे गरजेचे आहे व त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देखील देऊ शकतो यावेळी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप,नानाभाऊ येशी,देवेश भाऊ दंड, सागर बेलोकार ,प्रशांत पाटील विशाल पाटील, ओम टप, विशाल थेटे इत्यादी हनुमान सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने