महाराष्ट्रराज्य माथाडी श्रमजीवी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष पदी सुरेश वाघमारे यांची नियुक्ती




मुंबई (प्रतिनिधी ) आंबेडकरी चळवळीतील आंदोलन मोर्चा घेण्यात अग्रेसर असलेले युवा नेतृत्व  सुरेश वाघमारे यांची राजकीय सामाजिक कार्याची दखल  घेतं महाराष्ट्रराज्य माथाडी व श्रमजीवी कामगार सेनेच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच  नियुक्ती संघटनेचे  अध्यक्ष रवी  सरवदे यांच्या हस्ते व अजय बारी,राष्ट्रीय सरचिटणीस राजेश घाडगे खजिनदार यांनी नियुक्ती पत्र व ओळखपत्र देत उत्तर मुंबई  जिल्ह्याची जबाबदारी  बहाल केली असून सुरेश  वाघमारे यांनी श्रमजीवी कामगारांना संघटित करून असंघटित कामगारांचे  प्रश्न शासन दरबारीं जन आंदोलन उभारणार  व माथाडी कामगारांना न्याय मिळून देणार असे निवडी प्रसंगी सुरेश  वाघमारे यांनी आपले मनोगत  व्यक्त केले यावेळी किरण पुजारी, कामराज हरिजन. अमित कटारिया, मनोज केवट अझरुदिन अन्सारी मुल्ला, आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते वाघमारे यांच्या या नियुक्ती बद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन  होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने