शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव येथे दिनांक 5 ते 7 फेब्रुवारी 2022 दरम्यान कोरोना नियमांचे पालन करून भागवताचार्य ह.भ.प. श्री सुनिल महाराज जोशी यांच्या प्रमुख देखरीखी खाली महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.
शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता मंडप पूजन, गणपती पूजन, जलाधिवास, पुण्याह वाचनम, मातृका पूजनम व सायंकाळी 4 वाजता आरती होईल. रविवार दिनांक 6 फेब्रुवारी प्रांत पूजन, देवता स्थापन, धान्यदिवस, न्यासविधी व सायंकाळी 4 वाजता आरती तसेच रात्री 9 वाजता संकीर्तनाचा कार्यक्रम होईल.
दिनांक 7 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ठीक 8 वाजता महाअभिषेक पूर्णाहुर्ती, महाआरती महाप्रसाद दुपारी ठीक 12 वाजता चालू होणार आहे.
असा तीन दिवस बोरगांव येथे महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे तरी परिसरातील भाविकांनी मास्क व कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहण्याचे आवाहन बोरगांव ग्रामस्थांनी केले आहे.
Tags
news
