पिटकेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते सत्कार प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:  भारतीय जनता पार्टी प्रणित इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर येथील श्री. शिवशंभो ग्राम विकास सहकारी पॅनेलच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करवण्यात आला. संचालक निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या वाटचालीस हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
  पिटकेश्वर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक पदी नामदेवराव किरकत, कैलास येरळकर, पोपट येरळकर, उमेश मोरे, दत्तात्रय बोबडे  अजित जाधव, राहुल भिसे, विलास भोंग, गोविंद कांबळे, अशोक जाधव, मधुकर पोळ, आशा किरकत, उषा येरळकर या सर्वांचा संचालक पदी निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला.
   हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यकारी सोसायटी  सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नुतन संचालक यांनी आपले मत व्यक्त केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने