दोडाईचा- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरिक्षक यांचे पथक आणि दोंडाईचा पोलिसांनी संयुक्त कामगिरी करत दोंडाईचात तब्बल ३० लाख २६ हजार ७९० रुपयांचा गांजा पकडला आहे. छोटा हत्ती वाहनातून गांजा विक्रीसाठी नेण्यात येणार होता. गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. एकाला ताब्यात घेण्यात यश आले असून, त्याचे दोन साथीदार फरारी झाले. ही कारवाई आज, २४ फेब्रुवारीला दोंडाईचा शहरातील मालपूर रोडवरील सदा आप्पा चाळीजवळील पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, विशेष पोलीस उपमहानिरिक्षकांच्या पथकातील पोलीस निरिक्षक बापू रोहोम, सहायक पोलीस निरिक्षक सचिन जाधव, सहायक पोलीस उपनिरिक्षक बशीर तडवी, पोहेकाँ रामचंद्र बोरसे,
रोहोम, सहायक पोलीस निरिक्षक सचिन जाधव, सहायक पोलीस उपनिरिक्षक बशीर तडवी, पोहेकाँ रामचंद्र बोरसे, पोहेकाँ सचिन धारणकर, पो. ना. प्रमोद मंडलिक, पोना. मनोज दुसाने, पोकाँ सुरेश टोंगारे हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली, की दोंडाईचा येथून छोट्या हत्ती वाहनातून गांजा विक्रीसाठी नेणार आहेत.
या पथकाने तातडीने दोंडाईचा पोलीस ठाण्यात येऊन सहायक पोलीस निरिक्षक एस. टी. लोले, पोलीस उपनिरिक्षक दिनेश मोरे, पोहेकाँ चंद्रकांत साळुंखे, पो. ना. विश्वेश हजारे, पो. ना. संदीप कदम, पोकाँ योगेश पाटील, पोकाँ अनिल धनगर यांना सोबत घेतले. ही दोन्ही पथके मालपूर रोडला रवाना झाली. हर्षल सुरेंद्र पाटील यांच्या बंगल्याजवळ संशयित छोटा हत्ती वाहन (क्रमांक एमएच १६- ३३५२) दिसले.
Tags
news
