जवखेडा -आज दिनांक २४/०२/२०२२ रोजी पहाटे ०४.३० वाजेच्या सुमारास जायखेडा पोलिसांना माहिती मिळाली की, पिकअप क्रमांक MH-02, YA 5964 या वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने गोवंश गाई व गोर्यांची निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी वाहतूक करताना पिकप वाहन चालक यास करंजाड गावाचे चौफुलीवर वाहनांचे नियंत्रण सुटल्याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगात असल्याने जागीच पलटी झालेले आहे व वाहन चालक व त्याच्या सोबतचा एक अज्ञात इसम हे वाहनातील गाईसह वाहन सोडून तेथून पसार झालेले आहेत. अशी माहिती मिळाल्यानंतर जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ हे क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीची पाहणी करून करंजाड गावाच्या ग्रामस्थांच्या मदतीने तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांच्या मदतीने सदर वाहनातील गाई व गोर्यांना वाहनातून बाहेर काढले. त्यावेळी कोंबून जनावरांची वाहतूक केल्यामुळे एक बैल वाहनातच मयत झालेला होता. व उर्वरित सहा जनावरांना पालन-पोषण कामे ताराबाद येथील गोशाळेत दाखल केलेले असून जायखेडा पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळावर जाऊन मुक्या प्राण्यांचा जीव वाचवून पिकअप वाहन चालक व त्याच्या सोबतचा एक अज्ञात इसम याच्याविरुद्ध जायखेडा पोलीस ठाणे येथे प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
Tags
news
