मालपुर ता.शिंदखेडा येथील प्रगतीशिल शेतकरी श्री कमलेश बाजीराव पाटील यांनी चुडाणे शिवारातील आपल्या शेतात सोयाबीन हा वान फुले संगम जातीचा बीज पेरणी केली आहे.
त्यांचा एत्तमशेतीवर फुललेला शेत जणु धरणीमातेने हिरवा शालुच परिधान केलेला आहे. सोयाबीण वान दोंडाईचा येथील महाबीज मंडळआधिकारी सौ.ठाकरे मॅडम,लोणखेडा येथील के.व्ही. पटेल आॅफ अॅग्रीकल्चर चे विध्यार्थी मुले. प्राध्यापक श्री अनिल पाटील ,शेतकरी कमलेश पाटील आपली सोयाबीन पहाणी करुन विद्यार्थिना शाश्वत शेती करण्याचा मार्गदर्शन केले. व मुलनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्या.
प्रगतीशिल शेतकरी कमलेश पाटील शाश्वत शेती कशी होईल याकडे शेतकरीबांधवांनी कल वळवला पाहिजे. सध्या ऊधासिन शासनाच्या धोरणामुळे शेती हा व्यवसाय परवडणारा नाहीशा झाला आहे. त्याला अनेक कारणे देखीलआहेत माल पिकवला तर भाव स्थिर नाहीत पोटाच्यामुला प्रमाणे काळजी घेवुन राञी बे राञी पाणी भरावे लागते त्यात विज वितरणाचा मनमाणि पणा कारणीभुत असतो...
माघडी फवारे, रासायनीक खतांचा बळीमार या मुळेदेखील शेटकर्यांना न परवळणारा झाली आहे.त्यामुळे शेतीपिक नाशक बनत चालली आहे. शाश्वत शेतीकडे वळा हाच मोलाचा संदेश मी शेतकरी बांधवांना देवु शकतो व थांबतो." जय जवान ।जय किसान " .
Tags
news
