शिरपूर - तालुक्यातील वरला ते खामखेडा दरम्यान अवैधरित्या मोटरायकलीने सागवानी लाकडाची विनापरवाना चोरटी वाहतूक केली जात होती. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यामुळे संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन लाकूड सोडून पसार होण्यात यशस्वी झाला. वनविभागाच्या पथकाने मोटर सायकलसह १५ ते १८ हजार रुपयांचे सागवानी लाकूड जप्त केले आहे. शिरपूर तालुक्यातील सांगवी वनपरिक्षेत्रातील अधिकारी स्वाती गर्भी व कर्मचारी वरला ते खामखेडा ररस्त्यावर गस्त घालत होते. तेव्हा एक जण अवैधरित्या विनापरवाना सागवानी लाकूड मोटरायकलीवर लादून चोरटी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पथकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता वनकर्मचाऱ्यांना बघून मोटारसायकल व सागवानी लाकूड सोडून संशयित अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सागवानी लाकूड व मोटारसायकल ताब्यात घेऊन जप्त केल. त्याची किंमत १५ ते १८ हजार रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती गर्भरे, वनपाल बी. बी. पाटील, वनरक्षक नितीन बेडसे, स्वप्नील पाटील, सोनी कोकणी यांनी केली आहे.
Tags
news
