पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका लष्करी जवानाची आत्महत्या प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:भारतीय सेना दलात नर्सिंग असिस्टंट असणाऱ्या तरुणाने बायकोच्या आणि सासुरवाडीच्या लोकांच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, गोरख नानाभाऊ शेलार ( वय 24 राहणार वानवडी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगीता युवराज पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील ( सर्वजण राहणार शहादा जिल्हा नंदुरबार ) यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केशव शेलार यांनी यासंदर्भात तक्रार दिली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्यदलात नर्सिंग असिस्टंट म्हणून नोकरीत असलेले गोरख शेलार हे ट्रेनिंगसाठी काही दिवसांपूर्वी वानवडी येथे आले होते. गेल्याच वर्षी त्यांचा अश्विनी हिच्यासोबत विवाह झाला होता. अश्विनी हिला दिवस देखील गेले होते मात्र पत्नी आणि सासरची मंडळी त्यांना सतत मानसिक त्रास देत होते. नोकरी घालवण्याची तसेच गर्भपात करण्याची आणि तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करु, अशी देखील धमकी देत असल्याने ते मानसिक तणावाखाली होते.

पत्नीला सोडचिठ्ठी दे आणि पंधरा लाख रुपये दे, असे म्हणून सासरच्या मंडळींकडून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आत्महत्येपूर्वी गोरख यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ तयार करून सुसाईड नोट देखील लिहून ठेवल्याने उघड झाले आहे . आत्महत्येला पत्नीसह तिचे कुटुंबीय जबाबदार असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने