जेष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांचे निधन नाशिक शांताराम दुनबळे.




नाशिक=नाशिक जवळील वाडिवर्हे, ता.ईगतपुरी येथील जेष्ठ पत्रकार अशोक विष्णु शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
   म्रुत्युसमयी त्यांचे वय ५८ वर्षे होते.
   त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई आदी परिवार आहे.
   त्यांनी दै.देशदुत, सी न्युज , दिशा न्युज  आदीच्यां माध्यमातून तब्बल तीस ते पस्तीस वर्षे पत्रकार म्हणून काम केले. तसेच ते एक लघुउद्योजक म्हणून ही प्रसिद्ध होते.
   गुन्हे विश्वावर आधारित शोध पत्रकारिता करण्यात त्यांचा हातखंडा होता. परिसरात ते पोलीस मित्र म्हणून ही ओळखले जात होते.
   वाडिवर्हे येथील व्यावसायिक दिलीप शिंदे यांचे ते जेष्ठ बंधू तर मनोज फोटो स्टुडिओ चे संचालक मनोज शिंदे यांचे ते वडील होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने