शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कोणतेही पूर्वसूचना न देता व वीज बिलांची थकित रकमेतून काही रक्कम जमा केल्यानंतर देखील अचानकपणे विज कनेक्शन कट केल्याने शेतकरी संतप्त झाले होते त्यासाठी वीज मंडळाच्या शिरपूर येथील कार्यालयावर भेट देऊन शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली होती मात्र तरी देखील कोणताही तोडगा न निघाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वरुड येथील वीज मंडळाच्या कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला होता .संबंधित प्रकरणात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरकारी कामात अडथळा आणला या कारणास्तव एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त होऊन आज पुन्हा त्यांनी विविध राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत वीज मंडळाचे कार्यालय गाठत याबाबत जाब विचारला असून आंदोलन करताना सर्व शेतकरी उपस्थित असताना वीज मंडळाचे अधिकाऱ्याने फक्त एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करुन अन्याय केला असेल असून सदर दाखल केलेला खोटा अन्यायकारक गुन्हा मागे घ्यावा यासाठी आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून मागणी केली आहे.
फक्त एकाच व्यक्तीवर गुन्हा दाखल केला .. २७ तारखेच्या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते तरीही मुद्दाम एकाच व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला .. आंदोलनानंतर दुपारी ३ वाजता शेतकरी व MSEB च्या अधिकाऱ्यांमध्ये पोलिसांच्या मध्यास्तीने बिलांसंदर्भात तोडगा काढण्यात आला होता .. पण त्याच दिवशी संध्याकाळी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा दाखल केला .. म्हणून आज सकाळी पोलीस निरीक्षक श्री रवींद्रजी देशमुख साहेबांना निवेदन देण्यात आले .. व दाखल झालेल्या चुकीच्या गुन्ह्याची निपक्ष सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
विज मंडळाच्या प्रचलित कायद्यानुसार कोणत्याही वीज कनेक्शन धारकाला कनेक्शन कट करणे आधी त्याला नोटीस देणे बंधनकारक आहे मात्र शेतकऱ्यांच्या आरोपानुसार त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे वीज कनेक्शन कट केल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आधीच शेतकरी संकटात असताना यामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
यावेळी पीडित शेतकऱ्यांसोबत
भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिरीष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पवार, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विकी चौधरी ,वीज ग्राहक संघटनेचे संजयजी असापुरे , वीज ग्राहक संघटनेचे तालुका अध्यक्ष गोपाल भाऊ मारवाडी व पश्चिम भागातील शेतकरी बांधव संभाजी पाटील , जगदीश पवार , भाऊसाहेब पवार रवींद्र पाटील ,विशाल पवार , अनिल पवार ,दत्तात्रय पाटील, बाळासाहेब पाटील ,आबा पाटील आणि संभाजी पाटील ,आप्पा पाटील ,बंडू पाटील, बंडू दादा, नाना गिरासे ,कल्याण गिरासे, भरत गिरासे ,पिंटू गिरासे ,भिमसिंग गिरासे, शशिकांत पाटील ,रवींद्र पाटील, अरविंद पाटील, मुकेश पाटील ,भाऊसाहेब जाधव, अशोक पाटील, प्रकाश पाटील, शालिक पाटील ,भैय्यासाहेब साहेबराव कोळी, विश्राम कोळी, बबन पाटील, सुनील पाटील, शशिकांत पाटील, राहुल पाटील, नरेंद्र पाटील ,अशोक पाटील ,यांच्यासह शेकडो शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते .
वीज मंडळातील अधिकाऱ्यांच्या दुजाभाव
शेतकऱ्यांवरील बाकी असलेल्या वीज बिलाच्या वसुलीसाठी सक्तीची वसुली केली जात असून यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला किमान पाच हजार रुपयाच्या भरणा करावा अशी अट वीज मंडळाने घातली होती त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपल्या वीज बिलांच्या थकबाकी तून पाच हजार रुपयाच्या भरणा हा संबंधित वायरमन वसुली करणारे अधिकारी यांच्याकडे केला आहे .मात्र अनेक शेतकऱ्यांना याबाबत पैसे जमा करून देखील कोणतीही पावती देण्यात आलेली नाही यावरुन असे दिसून येत आहे की सदरच्या पैसा हा वीज मंडळाच्या खात्यात न जाता व शेतकऱ्यांच्या वीजबिलातून कपात न होता वायरमन च्या खिशात गेला का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे थकित वीज बिलामुळे कनेक्शन कट करण्याची सक्ती करणाऱ्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपल्या विभागातील वीज बिलांच्या दलाली करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मात्र कोणतीही कारवाई केली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत कारवाई होऊ शकते तर मग विज बिल यांच्या नावाने वसुली करून भरणा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नाही असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन कट करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना कायदे लागू होत नाही मात्र कायदे फक्त शेतकऱ्यांनाच लागू होतात का असा देखील प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे
Tags
news
