मुलानेच 78 वर्षाच्या वृद्ध वडिलांना विळा मारून केले जखमी नांदुरा शहरातील घटना मलकापूर - उमेश ईटनारे




: पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घ्या , असे म्हणत मुलानेच ७८ वर्षांच्या वृद्ध वडिलांना विळा मारून जखमी केले . ही घटना काल , ३ फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास नांदुरा शहरातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये घडली . या प्रकरणी आज , ४ फेब्रुवारी वृद्ध वडिलांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . शत्रुघ्न तुकाराम वाकुडकर ( ७८ , रा . वॉर्ड क्र . ६ , नांदुरा ) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली . ते त्यांच्या नातवाला विळ्याने ऊस कापून देत होते . त्यावेळी त्यांचा मुलगा हा घराच्या वरच्या मजल्यावरून हातात काठी घेऊन आला . तुम्ही माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार परत घ्या , असे म्हणत काठीने मारहाण केली . त्यानंतर विळा हिसकावून वृध्द बापाला विळा मारून जखमी केले . तुम्ही तक्रार मागे घेतली नाही तर तुम्हाला अन् तुमच्या बायकोलाही मारीन , अशी धमकी मुलाने दिल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे . तक्रारीवरून पोलिसांनी अनंत शत्रुघ्न वाकुडकर ( ३४ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने