तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र/उपकेंद्रात 24 तास अत्यावश्यक सेवा म्हणून आरोग्यसेवक/परिचारिका यांची नेमणूक शासनाकडून केलेली असते व तसा 24तास सेवा देण्याचा पगार देखील आरोग्यसेवक/परिचरिकांना शासनाकडून मिळतो पण दुर्दैवाने जातोडा उपकेंद्रात मागील बऱ्याच दिवसांपासून 24तास सेवा देणारा आरोग्यसेवक नाही.
वाडी आरोग्य केंद्रांअंतर्गत येणाऱ्या *जातोडा आरोग्य उपकेंद्रात 24तास अत्यावश्यक सेवा म्हणून परिचारिका/आरोग्यसेवक हवा अशी मागणी शिरपूर तालुका सरपंच महासंघ* तर्फे करण्यात येत आहे.
गावांत आरोग्य उपकेंद्र असतांना देखील गरिबांना 24तास सेवा उपलब्ध नसल्याकारणाने रात्री बेरात्री तालुक्याच्या गावी जावे लागते.
आरोग्य उपकेंद्राला कुलूप असल्याकारणाने मागच्या आठवड्यात जातोडा गावातील एका गरीब पेशंट ला प्रसूती साठी शिरपूर ला जावे लागले.
आज बोरगाव येथील एका आदिवासी मुलीला प्रसूतीपूर्व ऍडमिट करण्यासाठी एक तास थांबावे लागले कारण आरोग्य उपकेद्राला ताळे होते.
तालुक्यातील आरोग्य केंद्र/उपकेंद्रात 24तास हजर राहण्याचा नियम असून देखील आरोग्यसेवक/परिचारिका या कडे साफ दुर्लक्ष करून गरिबांच्या जीवाशी खेळत आहेत. या कडे शिरपूर तालुका आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे अशी विनंती वजा इशारा शिरपूर तालुका सरपंच महासंघ तर्फे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या कडून देण्यात आला आहे.
Tags
news
