19 वर्षीय तरुणीनी घेतला गळफास चिखली तालुक्यातील घटना मलकापूर - उमेश ईटणारे



१ ९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना आज , १३ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता भरोसा ( ता . चिखली ) येथे समोर आली . काजल पंढरीनाथ जाधव ( रा . भरोसा , ता . चिखली ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे . काजलने राहत्या घराच्या मागील बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतला . घरातील इतर सदस्य झोपेतून उठले , तेव्हा त्यांना काजल दिसली नाही . घराच्या मागील बाजूला जाऊन पाहिल्यावर तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला . घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . पंचनामा करून मृतदेह चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे . काजलने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने