शिरपूर - शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजाची रंगेहात विक्री करताना आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात तालुका पोलिसांना यश आले असेल याबाबत मुद्देमाल जप्त करून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 17/01/2022 रोजी शिरपुर तालुका पोलीस स्टेशन हददीतील पळासनेर गावाचे शिवारात रिचापाडा फाटयावर इसम नामे 1) सुनिल कुसाराम पावरा वय 19 वर्षे रा.पळासनेर 2) विजय अशोक कोळगे वय 25 रा.लोणी प्रवारा खुर्दे ता. राहता जि.नगर 3) सुरेश छबुलाल खबळे वय 39 रा.लोणी प्रवरा खुर्दे ता.राहता जि. नगर हे सुका गांजा सदृश्य अंमली पदार्थाची डील (देवाण घेवान) करणार असल्याची मिळालेल्या गुप्त बातमी वरुन 18.00 वा वर नमुद इसमांना गांजाच्या डिल करतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचे ताब्यात खालील नमुद मुददेमाल मिळुन आला आहे.
1) 1,21,000/- एकुण 12 किलो 70 ग्राम निव्वळ वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ हिरवट रंगाचा, पान. बिया व काडयांचा चुरा असलेला सुकलेला उग्र
वासाचा प्रती किलो सुमारे 10,000/- रुपये
2) 20,000/- रोख रुपये
3) 30,000/- तीन मोबाईल हॅण्डसेट जु.वा. कि. अं.
4) 30,000/- मो.सा. क्रमांक एम.एच. 18 AU 5420 जु.वा. कि. अं. 5) 30,000/- मो. सा. क्रमांक एम.एच.41 BA0356जु.वा. कि. अं असा एकुण 2,31,000/- (दोन लाख ऐकतीस हजार हजार मात्र) या मुद्द्यावर पंचांसमक्ष हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रविणकुमार पाटील सो., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत बच्छाव सो. व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर श्री. अनिल माने सो. यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पो.स्टे. चे सपोनिसुरेश शिरसाठ, पोसई भिकाजी पाटील ,असई लक्ष्मण गवळी, असई नियाज शेख ,पोहेका चेतन खसावद, ,पोना अनिल चौधरी, पोना आरीफ पठाण, पोना प्रवीन धनगर, पोना/साळुंखे, पोकॉ वळवी, पोकॉ कृष्णा पावरा, पोकॉ मुकेश पावरा, पोकॉ मनोज नेरकर, चापोहेकॉ सईद शेख, चापोकॉमनोज पाटील अशांनी केली आहे वरील प्रमाणे माल हस्तगत करण्यात आला आला आहे. सदर इसमां विरुध्द पो.ना/ प्रवीण धनगर यांचे फिर्यादीवरुन एनडीपीएस कायदा कलम 20 व 22 प्रमाणे शिरपुर तालुका पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई भिकाजी पाटील हे करीत आहेत.
Tags
news
