नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या अभिनव उपक्रमात दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल ज्यू कॉलेजचा सहभाग नाशिक शांताराम दुनबळे.




नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे नवीन वर्षाचे स्वागत एक लाख कि मी  सायकलिंग चा अभिनव उपक्रमत दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयातील विध्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर सी वडजे यांनी उपक्रमात सहभागी होणारे विध्यार्थी व शिक्षक यांचे स्वागत केले.यावेळी वडजे यांनी बोलतांना सांगितले की, पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने व आर्थिक दृष्टीने प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी व ऊर्जा ,इंधन, पाणी बचत करणे काळाची गरज आहे.तसेच व्यायाम केल्याने आजारावर मात करता येते.म्हणून अशा उपक्रमात व नियमित पणे सायकल चालवणे, पायी चालणे, योगासने करणे यात सातत्य ठेवावे असेही आवाहन वडजे यांनी केले.
यावेळी प्राचार्य आर सी वडजे, उपप्राचार्य यु डी भरसठ, पर्यवेक्षक डॉ जी व्ही आंभोरे, श्रीम एन पी बागुल, आर व्ही मोकळ, आदींच्या हस्ते या उपक्रमात सहभागी झालेले, संतोष कथार, अरुण पाटील, मनोज पवार, बाळासाहेब पाटील यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  व्ही बी शिंदे यांनी तर आभार क्रीडाशिक्षक प्रमोद गायकवाड यांनी मानले.
शिक्षकांचे स्वागत करून शुभेच्छा- 
या अभिनव उपक्रमात सहभागी झालेले संतोष कथार, अरुण पाटील, मनोज पवार, बाळासाहेब पाटील यांनी नाशिक ते जनता इंग्लिश स्कुल दिंडोरी व पुन्हा परतीचा प्रवास असा एकूण 50 ते 60 किमी सायकल रायडिंग करण्यात आली.यावेळी या सहभागी शिक्षकांचे ग्रामपंचायत तळेगांव दिंडोरी ग्रामस्थ, वणारवाडी सरपंच व ग्रामस्थ, विद्यालयाचे प्राचार्य आर सी वडजे, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, व शिक्षेतर कर्मचारी, तसेच नाशिक ग्रामीणचे वाहतूक पोलीस यांनी स्वागत करून अभिनंदन केले.
 नाशिक सायकलिंस्ट फाउंडेशन नेहमीच आरोग्यासाठी विविध उपक्रम सतत राबवत असते.याचेच औचित्य साधून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नासिक सायकलिस्ट फाउंडेशनने 100000(एक लाख ) कि मी सायकलिंग करून साजरा करायचा करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने