शिरपूर - शिरपूर शहरात संरक्षक भिंत बांधण्याचे अंतर्गत वादातून बेदम मारहाण करण्याची घटना घडली असून शहर पोलीस स्टेशन येथे दहा जणांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वृत्त असे की, खालचे गाव, शिरपूर परिसरातील तारण तरण जैन मंदिराजवळ वास्तव्यास असलेल्या एका २८ वर्षीय सिव्हील इंजिनियरच्या वडिल व भावास प्लॉटच्या संरक्षण भिंतीवरून उफाळलेल्या वादात दहा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मारहाणीसह दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. सिव्हील इंजिनियर वैभव नामदेव बारी (२८) रा. तारण तरण, जैन मंदिराजवळ, खालचे गाव शिरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास श्रीराम नगरातील त्यांच्या मालकीच्या प्लॉट क्र. २७ ते ३० च्या मोकळ्या जागेवर संरक्षक भिंतीचे कामकाज सुरू होते. यावेळी सतिष साहेबराव पाटील, श्रीकांत दिलीप चव्हाण, कैलास रतनलाल अग्रवाल, मयुक कैलास अग्रवाल, पंडीत साहेबराव पाटील, नरेंद्र साहेबराव पाटील व इतर , चौघांनी हुज्जत घालून वडिल व भावास मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यातील सतिष साहेबराव पाटील याने त्यांच्या प्लॉटवर पोकलॅण्ड, डम्पर, ट्रॅक्टर उभे करून ते तेथुन काढणार नाही, अशी धमकीही दिली. या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दि. २१ जानेवारी रोजी वरील दहा संशयितांवर भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४ ९, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
news
