*दोडांईचात रोटरी सिनियर्सतर्फे आयोजित दंतरोग चिकित्सा शिबिरात ७६७ रुग्णांची तपासणी* दोंडाईचा अख्तर शाह



 महावीर दाल आणि आँइल मिल प्रायोजित रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स आयोजित ऐ.सी.पी.एम.डेन्टल काँलेज धुळे व डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ डेनेस्ट्री धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत दंतरोग चिकित्सा शिबिर संपन्न झाले.शिबीराचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल डि.जी.संतोष प्रधान यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणेपदी रोटरीचे प्रांत सचिव परिमल देसाई उप प्रांतपाल हितेश शाह  महावीर दाल आणि आँइल मिलचे संचालक सुरेश जैन ,ऐ.सी.पी.एम.दंत महाविद्यालयाचे समन्वयक डॉ वर्धमान जैन इ.मान्यवर उपस्थित होते .
    शिबिरात रुग्णांची तपासणी ऐ.सी.पी.एम.डेन्टल काँलेजचे प्राचार्य डॉ अरुण दोडामनी व त्यांचे प्रमुख ३० दंतरोग चिकीत्सक यांनी केली . शिबिरात एकुण ७६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असुन त्यात प्राथमिक तपासणी करुन आवश्यकतेनुसार दात स्वच्छ करणे ,दातांमधिल गँप भरणे ,खराब दात काढणे इ लहान ३७८ शस्त्रक्रिया त्वरीत करण्यात येऊन रुट कँनल तथा नविन दात बसवीण्यासारखे दिर्घकालीन उपचार प्राथमिक तपासणी करुन पुढील उपचार अत्यंत माफक दरात धुळ्यातील जवाहर फाऊंडेशनचे दंत महाविद्यालयात करण्यात येतील .  
प्रांतपाल संतोष प्रधान यांनी बोलतांना सांगितले की दंतरोग चिकीत्सा हि या काळातली अत्यावश्यक चिकीत्सा असुन रुग्णांना बहुतांश मुखातले आजार हे अस्वच्छ दातांमुळे होत असतात.
दंतरोग चिकित्सा शिबिर यशस्वीतेसाठी प्रो चेअरमन प्रविण महाजन ,को.प्रो.चेअरमन रविंद्र पाटील ,माजी अध्यक्ष चेतन सिसोदिया ,सचिव अँड नितीन अयाचीत ,राजेश मुणोत , डॉ मुकुंद सोहनी ,हुसेन विरदेलवाला ,नामदेव थोरात ,के.टी.ठाकुर , डॉ राजेंद्र पाटील ,अमन जयस्वाल , डॉ राजेंद्र गुजराथी , राजेंद्र परदेसी , डॉ अनिकेत पाटील , दिनेश कर्नावट ,महेंद्र चोपडा,अनुराधा सोहनी , डॉ गणेश खैरनार , डॉ हितेंद्र देशमुख,शेखर कोठारी , डॉ अनिल धनगर ,सौ प्रतिभा ठोंबरे ,जवाहर केसवानी , केदारनाथ कवडीवाले ,सुमित जैन ,किशोर मालपुरकर ,राजेश भंडारी ,दिलीप वाघेला इ सदस्यांनी तसेच रोटरी स्कुल रोटरी हाँस्पीटल ,रोटरी पतपेढी इ कर्मचारी व आर.सी.सी.रोटरी अपंग राऊंड टाऊनच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने