अधिकृत वैद्यकीय परवान्या शिवाय उपचार करून रुग्णाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टर बाबत तत्काळ कारवाई करा.




अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र ज्यांची  आरोग्य मंत्र्याकडे मागणी
आरोग्य विभागाने करोणाच्या काळामध्ये उत्तम रित्या काम केलेले आहे मात्र दुर्गम भागात तसेच ग्रामीण भागात जिथे आरोग्य सुविधांचा अभाव आहे अशा ठिकाणी बोगस डॉक्टर  व तोतिया आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुळसुळाट झाला आहे बोगस डॉक्टर ती लोक रुग्णावर उपचार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र उघड झाल आहे या बोगस डॉक्टरांवर अंकुश लावण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात छोटी मोठी भरारी पथक तयार करून मोठी रुग्णालय आणि दवाखाने ऑडिट करणे गरजेचे आहे असे मत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी, प्रदेश सचिव रोहित वाघ, व सहसचिव महादेव मुंडे, व कार्याध्यक्ष नासीर पठाण, राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर पायघन,  कोषाध्यक्ष राम घोटकर , विदर्भ विभाग प्रमुख योगेश कुंडे , मुंबई विभाग अध्यक्ष व राज्य कार्यकारणी सदस्य हर्षराज आहिरे,  व सोशल मीडिया प्रमुख प्रा अविनाश ढोबळे, व सोलापूर जिल्हा प्रमुख अनिल सरडे,  व खानदेश विभाग अध्यक्ष प्राध्यापक सुशील पाटील यांनी व्यक्त केला आहे यादृष्टीने तीन महिन्यातून एकदा तरी ऑडिट करून दोषींवर कडक कारवाई करून योग्य ते शिक्षा देण्यात यावी यासाठी  प्रशासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे  अशी मागणी माननीय राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे साहेब यांच्याकडे करण्यात आली आहे.


डॉ. पंकज चौधरी प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने