गुलाबराव पाटील यांना सरपंच पदाचा कार्यभार द्या... औरंगाबाद खंडपीठाचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी कायम केले....*



    संपूर्ण जिल्ह्यासाठी व परिसरासाठी उत्सुकतेचा विषय म्हणजे मुकटी ग्रामपंचायतीचे सरपंच कोण गेल्या दोन वर्षापासून मुकटी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरून परस्परांमध्ये वाद होता.
     पार्श्वभूमी अशी की 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदी  गुलाबराव आनंदा पाटील बहुमतांनी विजयी झाले. तेव्हा रितेश पाटील व प्रदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर करून त्यांना 2013 च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत निर्धारित वेळेत खर्च सादर केला नाही, या कारणांनी गुलाबराव पाटील यांना जिल्हा अधिकारी यांनी पाच वर्षासाठी अपात्र केले आहे असा दावा करून औरंगाबाद खंडपीठाने त्यांची सरपंच पदाची निवडणूक रद्द करून पदावरून पायउतार केले, या पार्श्वभूमीवर श्री गुलाबराव आनंदा पाटील यांनी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने  गुलाबराव आनंदा पाटील यांना जिल्हा अधिकारी यांनी व औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय रद्द करून त्यांचा अपात्रतेचा कालावधी कमी करण्यासाठी जिल्हा अधिकारी धुळे यांच्याकडे प्रकरण पाठविले,परंतु जिल्हा अधिकारी धुळे यांनी अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार माननीय विभागीय आयुक्त यांचे असून त्यांनीच या प्रकरणात निर्वाळा करावा, असा आदेश दिला. माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांनी  गुलाबराव आनंदा पाटील यांच्या विरोधात निर्णय दिला, गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या आदेशाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली,याचिकेवर निर्णय होऊन पुन्हा जिल्हा अधिकाऱ्यांनी तो निर्णय घ्यावा असे आदेशित करण्यात आले,या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा अधिकारी संजय यादव यांनी त्यांच्या पाच वर्षाचा पात्रतेचा कालावधी दोन वर्ष निर्धारित केला परिणामी गुलाबराव आनंदा पाटील सरपंच पदी विराजमान झाले परंतु  रितेश पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांचा आदेश विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे आव्हान दिले पुन्हा विभागीय आयुक्त नाशिक यांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निर्णय दिला निवडणूक खर्चाचे सदर प्रकरण गुलाबराव पाटील यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केले,सदर याचिकेवर न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी स्पष्ट निर्वाळा दिला की,मुकटी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचा कार्यभार  गुलाबराव पाटील यांच्याकडे तात्काळ सोपवावा.असे स्पष्ट आदेशित केले. व दोन आठवड्यांची स्थगिती ही दिली, रितेश पाटील हेच प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे पुन्हा स्पेशल पिटीशन दाखल केली दिनांक 6 जानेवारी 2022. रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश कायम करत रितेश पाटील यांची याचिका फेटाळून लावली या पार्श्वभूमीवर पुन्हा तिसऱ्यांदा श्री गुलाबराव पाटील वय वर्ष 80 मुकटी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कार्यभार दिनांक 7/1/2022 रोजी स्वीकारला.
       शेवटी बहुचर्चित मुकटी ग्रामपंचायतीचे सरपंच कोण हा वाद माननीय सर्वोच्च न्यायालयाने पूर्णविराम दिले, आणि गुलाबराव पाटील हेच मुकटी ग्रामपंचायतीचे सरपंच असतील असा स्पष्ट निर्वाळा दिला. श्री गुलाबराव पाटील यांच्याकडून ऍड,सुधांशू चौधरी ऍड,अमरजीत सिंग गिरासे ऍड,योगेश बोरकर ऍड, श्वेता इनामदार ऍड, शशांक सरपोतदार यांनी कामकाज पाहिले
    गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया...
     मी समस्त मुकटी ग्रामस्थांचे व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभारी आहे. माझ्या न्यायालयीन संघर्षाचा लढा यशस्वी झाला. यापुढच्या काळात मुकटी गावाचा विकास हेच माझे ध्येय राहील.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने