धुळे - बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणी महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांसह तिघे जणांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
नागरिकांना खोटे प्रमाणपत्र देण्यात आली याबाबत सहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांनी शहर पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीसांनी चौघे जणांना शुक्रवारी रात्री अटक केली. दिनांक 15 जानेवारी शनिवारी दुपारी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाने शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब पाटील यांनी चौघडा पुढील कामकाजासाठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Tags
news