*राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी सलमान शेख यांनी निवड*




ऑल इंडिया T20 क्रिकेट चॅम्पियनशिप ट्राफि क्रिकेट स्पर्धेसाठी धडगाव तालुक्यातील सलमान मुख्तार शेख यांची निवड झाली आहे,सलमान शेख यांना लहानपणापासून क्रिकेटची आवड होती,त्यांनी अनेक गावागावांमध्ये आपल्या खेडाची चमक दाखवली,यापूर्वी धुळे येथे झालेल्या निर्यात खेडयात विशेष प्रावीण्य मिळविले आहे,आता उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा येथे दि.31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या दरम्यान स्पर्धा होणार आहेत, या स्पर्धा t20 क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया तर्फे होत आहे,नॉर्थ महाराष्ट्र कोऑर्डिनेटर शेख मोहसीन सलीम यांनी मार्गदर्शन केले आहे,सलमान हे धडगाव येथील रहिवासी असून त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आज त्यांची निवड झाली आहे,यानिवडीबद्दल त्यांचे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांसाठी सलमानचे वडील मुख्तार शेख काका नबा शेख व मित्रपरिवार धडगाव ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्यात,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने