नगर परिषद हद्दीतील जातीवाचक नावे बदलून वस्त्यांना महापुरुषांचे नावे देण्यासाठी निवेदन



शिरपूर -  शिरपूर वरवाडे नगरपरिषद हद्दीतील जाति वाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देणे बाबत निवेदन आज शिरपूर शहरात बजरंग दल व विश्व हिंदू परिषद ,हिंदु राष्ट्रसेना यांच्या वतीने देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील गावांची वस्त्यांची व रस्त्यांची जाती वाचक नावे बदलून नवीन नावे देण्या बाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागाने शासन निर्णय  दिनांक.11 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेला आहे. त्या नुसार शिरपूर वरवाडे नगरपरिषद हद्दीतील वार्ड/प्रभागातील जाती वाचक नावे बदलून महापुरुषांचे नावे देण्यात यावे.सदर विषय हा काल मर्यादीत असल्याने लवकरात लवकर माहिती देवून व तसेच वार्ड/प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेवुन जाती वाचक नावे बदलून महापुरुषांचे नावे देण्यात यावे.तसेच प्रत्येक वार्ड/प्रभागातील महापुरुषांचे देण्यात आले नावांचे फलक(साईन बोर्ड) यांचा खर्च शि.व.न.पा. यांनी सहखर्चाने करावे असे निवेदन देण्यात आले  या वेळी विश्व हिंदू परिषद बजरंद दल,शिरपूर
हिंदु राष्ट्रसेना ,शिरपूर चे 
वावड्या पाटील,विशाल सोनार,सागर रामराव पाटील,प्रेमकुमार चौधरी,अमोल लोणारी,बंटी माळी,विक्की चौधरी,श्रीनाथ शिंदे,तुषार बारी,नक्षत्र पाटील,पवन माळी,किष्णा मराठे,जयेश मोरे,हर्षल बोरसे,दादा मराठे,पवन माळी,वैभव बोरसे,लक्ष्मण मराठे,गोलु मराठे,विक्की पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने