खर्दे विद्यालयात बालिका दिवस उत्साहात साजरा



तालुक्यातील आर .सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय‌ खर्दे
 या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिवस साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी.बी. धायबर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयाचे शिक्षक ए. जे. पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. आजच्या काळात स्री शिकल्यामुळे समाजाची राष्ट्राची प्रगती कशी झाली याचे उदाहरणे व दाखले अमोल सोनवणे यांनी दिले. तसेच बालिका दिवसाचे औचित्य साधून इयत्ता पाचवी व सहावी या लहान वर्गातील विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. बी. धायबर यांनी महापुरुषांचे विचार अंगीकारून आपले भविष्य आदर्शवत कसे करता येईल हे पटवून दिले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन पी. एस. अटकाळे यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी  विद्यालयाचे प्राचार्य पी .आर. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.बी. धायबर, ए. जे. पाटील, अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, डी. एम. पवार, बी .एस. बडगुजर, पी. एस. अटकाळे, बी .एस. पावरा, सुनिता सूर्यवंशी, सीमा जाधव,निकिता पाटील,सुवर्णा पाटील, सचिन पवार व ललित कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने