अ.भा.फार्मासिस्ट असोसिएशनच्या संघटनात्मक कार्याबद्दल आढावा बैठक संपन्न




 
नाशिक - अ.भा.फार्मासिस्ट असोसिएशनच्या संघटनात्मक कार्याबद्दल आढावा बैठक संपन्न नुकतीच संपन्न झाली.
या बैठकीत नाशिक विभागिय सल्लागार डॉ.संजयकुमार बारी सर,धुळे जिल्हा सल्लागार डॉ.ए.यु.टाटीया सर,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी सर,नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा.सुशिल पाटील सर उपस्थित होते. येणाऱ्या काळात अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन खालील मुद्द्यांशी एकजूट होऊन फार्मासिस्ट या नात्याने आपल्याला लढायचे आहे असा निर्धार करणयात आला. फार्मासिस्टच्या हक्कासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपली युवा फार्मासिस्ट सर्वगुणसंपन्न असूनही अनेक ठिकाणी फार्मासिस्टला संधी दिली जात नाही, तर या मिशन च्या माध्यमातून नवीन बुद्धिवादी नेतृत्व हे वर सांगितलेल्या सर्वच क्षेत्रात  पुढे आणायचेच हा मुख्य उद्देश आहे. फार्मासिस्ट शिक्षण व सरकारी नोकरी  खासगी जॉब, कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब होणारा अन्याय विरुद्ध आमची लढाई आहे.
मेडिकल व्यवसायी फार्मासिस्ट त्यामध्ये नॉन फार्मासिस्टचा आपल्या फिल्ड मध्ये वाढलेली संख्या त्यांचा असलेला प्रभाव आणि रिटेल सेक्टर मध्ये फार्मासिस्ट चा होणार अपमान,
इंडस्ट्रियालिस्ट फार्मासिस्ट आणि इंडस्ट्री मध्ये नॉन फार्मासिस्टची त्यांची घुसखोरी.
शासकीय फार्मासिस्ट { ग्रेड 2, RBSK, ESIC, BSP, SECL, सेना, रेल्वे, AIIMS, जेल विभाग } सरकारी फार्मासिस्ट वर होणारा अन्याय,
बेरोजगार फार्मासिस्ट आणि स्पर्धा परीक्षेतील फार्मसीस्ट चे स्थान,
MR फार्मासिस्ट होणारा अन्याय,
अकॅडेमिक मध्ये होत असलेली अवहेलना.
मेडिकल स्टोर फार्मासिस्ट,फार्मसी शिक्षक
फार्मसी विद्यार्थी,सर्व क्षेत्रातील फार्मासिस्टवर अन्याय विरुद्ध लढणारी निःस्वार्थ संघटना अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य आम्ही सर्व क्षेत्रातील फार्मासिस्टच्या हक्कासाठी लढाई लढत आहोत.
काम पडल्यास आपल्याला असोसिएशनच्या टीम सोबत आपल्याला कोर्टाची लढाई सुद्धा लढावी लागेल.  आपण स्वतंत्र भारताने स्वतंत्र नागरिक आहोत तरी कुठेही फार्मासिस्ट चा अपमान होत असेल तर तिथेच उत्तर द्या आपण भारतीय नागरिक आहोत गुलाम नाहीत हे फार्मासिस्टनी लक्ष्यात ठेवूनच
आपल्याला फार्मासिस्टचा आपला हक्क आपल्याला हिसकावून घ्यायचा आहे त्यासाठी आपण तयार व्हायला हवं. असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन एक संघटन आहे ती फार्मासिस्टच्या हक्कासाठी नेहमी लढत राहील.व  एकत्र येऊन आपले अस्तित्व आपण निर्माण करुया आपल्या फार्मसिस्ट चे अस्तित्व टिकावून ठेऊ या असा संकल्प या बैठकीत करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने