कोल्हापूर -शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांचे आज निधन झाला आहे. कोल्हापुरातील उपचारादरम्यान वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी असं वाटत होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना कोरूना चा संसर्ग देखील झाला होता परंतु या वयात देखील त्यांनी कोरोणावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती कामगार शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते आयुष्यभर लढत राहिले. नारायण नामदेव पाटील यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी सांगली जिल्ह्यातील नागाव मधील ढवळे येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम ए आणि एलएलबी असे शिक्षण घेतलं होतं.
आपल्या प्रारंभिक जीवनात 1954 ते 1957 या कालावधीत छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे प्राध्यापक व 1960 चाली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर येथे प्राचार्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. शिक्षण क्षेत्रातील अनेक मोठमोठ्या पदांवर जबाबदारी त्यांनी पार पाडली होती राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी भरीव कामगिरी केली असून 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून शेतकरी कामगार नेते म्हणून मुंबई गिरणी कामगार संघटना सरचिटणीस, विधान परिषद सदस्य ,सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य इत्यादी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम पाहिले होते. एन डी पाटील यांना विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले होते शिवाय त्यांनी विविध पदे देखील उपभोगली होती आणि त्यांच्या काही लेखन देखील प्रसिद्ध झाले आहे .मात्र त्यांची खरी ओळख शेतकरी व कामगार नेते म्हणून होते आणि शेतकऱ्यांच्या व कामगारांची आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला अशा या लढवय्या नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली
Tags
news
