संभाजीनगरमधील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास झालेला विरोधा मुळे राज्यभरात पडसाद शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाज व महाराणा प्रताप प्रेमी हिंदू संघटना यांचेकडून जाहीर निषेध व्यक्त





शिरपूर प्रतिनिधी  - शिरपूर  तालुका क्षत्रिय राजपूत समाज ,महाराणा प्रताप प्रेमी व हिंदू संघटना यांनी एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांच्या जाहीर निषेध व्यक्त करत निषेधाचे पत्र तहसीलदार शिरपूर यांना देण्यात आले आहे.

 याबाबत वृत्त असे की राज्यातील संभाजीनगर येथे नियोजन समिती मार्फत महानगरपालिका यांच्याकडून संभाजी नगर शहरात महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे .मात्र याबाबत येथील खासदार इम्तियाज जलील यांनी पत्र देऊन असे सूचित केले आहे की या निधीमधून महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारून काही उपयोग होणार नाही त्याऐवजी गरजू मुलांसाठी सैनिकी शाळा काढण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती ,मात्र त्यांच्या त्यांच्या या भूमिकेला समस्त राजपूत समाज महाराणा प्रेमी व हिंदू संघटना राष्ट्रीय राजपूत करणी सेना व करणी सेना महाराष्ट्र राज्य यांनी विरोध केला  असून राज्यभरात जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे
त्याचाच एक भाग म्हणून आज शिरपूर शहरातून या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी शिरपूर तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला त्यात असे नमूद करण्यात आले आहे की भारत देशात आपल्या राष्ट्रपुरुषांच्या रक्तरंजित असा इतिहास असून स्वाभिमान व देशभक्ती यासाठी आपल्या महान योद्ध्यांनी जीवाची बाजी लावून हिंदू धर्म व राष्ट्राचे रक्षण केले आहे आपला रक्तरंजित इतिहास  देशाला व समाजाला प्रेरणा देणारा असा आहे आणि यामुळे ऐतिहासिक परंपरेचे व त्यांच्या योगदानाला नमन करण्यासाठी व येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या जीवाचे बलिदान करणाऱ्या या महान क्रांतिकारक योद्ध्यांना नमन करत आपण त्यांचे पुतळे उभारण्याची परंपरा आहे.
 मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळ्याची गरज नाही असे सांगून राष्ट्रपुरुषांच्या अवमान केला आहे .आमच्या सैनिकी शाळा बांधण्यास विरोध नाही यासाठी यासाठी शासनाने वेगळा निधी मंजूर करावा मात्र त्या निमित्ताने राष्ट्रपुरुष यांच्या पुतळ्यास विरोध झाल्याने समस्त राजपूत समाज व हिंदू संघटनांच्या भावना दुखावल्या असून आम्ही या वृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त करतो असे निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत, सामाजिक कार्यकर्ते भुपेश परदेशी ,मयूर राजपूत, राज सिसोदिया, धीरज राजपूत,  मुन्ना राजपूत, माधव सिंग राऊळ, रामपाल सिंग राऊळ, पृथ्वीराज देशमुख, डीजे राजपूत, प्रदीप राजपूत, जयपाल राजपूत, आनंद पाटील ,मनोज राजपूत, प्रशांत राजपूत, हर्षल राजपूत ,देवेंद्र राजपूत,  राजपूत करून,  अनिल राजपूत, बापू कोळी इत्यादी समाजबांधवांनी सह्या केल्या आहेत .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने