प्रतिनिधी, शिरपूर
तालुक्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या समस्या, अंगणवाडी पदभरतीत पेसा कायद्याचा प्रभावी अंमल, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्यावरील अन्याय. आदी समस्यांच्या निराकरणासाठी बिरसा फायटर्सने एसडीएम, बीडीओ, सीडीपीओ यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे वरिष्ठांकडे मागणी केली.
प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेय की, वनजमीन अधिनियम 2008 साली अंमलात आला. मात्र अद्यापही तालुक्यातील बहुसंख्य वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळालेेले नाही, प्रत्यक्षात खेडत असलेल्या क्षेत्राची प्रमाणपत्रावर नोंद होणे, प्रमाणपत्रात परिवारातील सदस्यांची नावे शामील करणे. यांसह तालुका वनसमितीत आदिवासी शेतकऱ्यांना सदस्यत्व मिळण्याची मागणी केली. बरोबरच बीडीओ यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्यावर होत असलेला अन्याय तात्काळ थांबवून न्याय मिळण्याची मागणी केली. सीडीपीओ यांना अंगणवाडी पदभरती 'पेसा' च्या शिफारशींनुसार होण्याची मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी भोंग्या पावरा, कनिलाल पावरा, संघटनेचे राज्याध्यक्ष मनोज पावरा, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,महासिचव साहेबराव पावरा, तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, युवा पदाधिकारी मद्रास पावरा, काकड्या पावरा उपस्थित होते.
Tags
news
