शिरपूर - शिरपूर तालुक्यातील तोंदे गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौघा संशयितांवर थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील शेतकऱ्याने तक्रार दिली आहे. त्यानुसार गावातील मनोज शांताराम भील, रावसाहेब शांताराम भील, मुकेश शांताराम भील, मिराबाई शांताराम भील यांनी तक्रारदाराच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले. याबाबत जाब विचारला असता त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच 50 हजार रुपये दिले तरच मुलगी परत मिळेल अशी तक्रारही तक्रारदाराकडून करण्यात आली.
Tags
news
