तळोदा - दिनांक २०-०१-२०२२ रोजी सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा/शबरी सेवा समिती तर्फे तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील आंबागव्हाण फाटा ता.तळोदा येथे वाचनालय सुरुवात करण्यात आली.
या वाचनालय दैनंदिनी वृत्तपत्र, मासिक अशी सुविधा सेवाभावे प्रतिष्ठाने केली आहे. वाचनालयाचे उद्घाटन ॲड.श्री.सखाराम अर्जुन ठाकरे, श्री. रमाकांत वळवी यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे एकल संच प्रमुख श्री.दिलवर खोजल्या पावरा,श्री.सुनील भूषा पाडवी हे होते. यावेळेस सेवाभावे प्रतिष्ठान अध्यक्ष चि.उमेश भैय्या सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी श्री.नकुल दित्या ठाकरे, श्री.सुरसिंग काला ठाकरे,श्री.संजय बहादूरसिंग मोरे,श्री.चंबुलाल ठाकरे, श्री.धरमसिंग दौलत ठाकरे, चि.रोहन दिनेश गुरव,चि.अमित छोटूलाल पाटील हे उपस्थित होते.
यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे म्हणाले की, ग्रामीण भागात माहिती प्रसार होण्यासाठी दैनिक वृत्तपत्र, शेतकी मसिक यामुळे शेतकऱ्यांसाठी शेता नवीन प्रयोग यांची माहिती उपलब्ध होईल. म्हणून सेवाभावे प्रतिष्ठान ग्रामीण भागात अशाप्रकारे वाचनालय सुरु केले आहेत.
श्री.सुनील भुषा पाडवी म्हणाले की, सेवाभावे प्रतिष्ठाना जो उपक्रम आमच्या ग्रामीण भागात राबवला आहे त्यामुळे नक्कीच आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना फायदा होईल
श्री. दिलवर पावरा आपल्या आदिवासी बोली आपले मनोगत मांडले म्हणालेत की, सेवाभावे प्रतिष्ठाने ज्याप्रमाणे आपल्याला वाचनालय उपलब्ध करून दिले आहे त्याच्या आपल्या सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. वाचनालयात ऍग्रोवन सारखे पेपर मुळे आपल्याला आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी फायदा होईल.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सेवाभावे प्रतिष्ठानाचे उपाध्यक्ष श्री.सागर पाटील, संचालक श्री.अतुल भिमसिंग पाटील,श्री.नकुल दित्या ठाकरे,श्री.संतोष जगत चौधरी,श्री.अनिल भामू नाईक ग्राम समिती प्रमुख श्री.कुशल कोचऱ्या पाडवी, श्री.आकाश पाडवी, श्री.अनिल पाडवी, श्री.गणेश पाडवी, श्री.हरीश पाडवी, श्री.दिलीप पाडवी, श्री.संजय पाडवी, श्री.संदीप पाडवी, श्री.सुनील पाडवी, श्री.राजू वळवी, श्री.दिनेश वळवी, श्री.हिरालाल पाडवी, श्री.तापसिंग पाडवी, श्री.रमेश वळवी व ग्रामस्थांनी यांनी मेहनत घेतल्या.
या कार्यक्रमाचे आभार शबरी सेवा समिती जिल्हा समन्वयक श्री.नकुल दित्या ठाकरे यांनी मानले.
Tags
news
