शिरपूर - संजिवनी हेल्पिंग हंड फाउंडेशन अंतर्गत आज 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या संस्थेचे अध्यक्ष श्री. शांतीलाल फिरंग्या पावरा सर यांनी संस्थेबद्दल थोडक्यात माहिती दिली आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित प्रमुख पाहुणे श्री. जगन शेवाळे माजी सभापती यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले व आदिवासी कुलदेवी देवमोगरा माता या प्रतिमेचे पूजन केले त्यांच्या हस्ते व सरपंच च्या हस्ते मुलांना वह्या, पेन वाटप केले आणि मुलांना थोडक्यात मार्गदर्शन केले तसेच आदिवासी मुलांना जेवण देण्यासाठी नारळ फोडून उद्घाटन केले . तसेच श्री. शिवाजी मांजऱ्या वसावे सरपंच, श्री. रविंद्र वसावे सामाजिक कार्यकर्ते , श्री. खंडू गुलवणे ग्रामपंचायत सदस्य, श्री. कांतीलाल शिंदे सामाजिक कार्यकर्ते, श्रीमती टीमकाबाई पावरा, श्रीमती रमकाबाई गुलवणे तसेच गावकरी मंडळी इ. उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिपा गावीत मॅडम व शेवटी आभार प्रदर्शन गेजा पावरा मॅडम यांनी केले....
Tags
news
