अत्याचार विरोधी कृती समितीचे धान्य वितरण अधिकारी , नासिक यांना विविध तक्रारीचे निवेदन सादर तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा ईशारा.... नाशिक शांताराम दुनबळे




नासिक = अत्याचार विरोधी कृती समिती नासिक च्या वतीने मा. श्वेता पाटोळे मॅडम, (धान्य वितरण अधिकारी नासिकरोड, नासिक) यांना रेशन दुकानदाराच्या विविध तक्रारी तसेच सदरचे दुकान कार्डधारकांना सोयीच्या जवळच्या ठिकाणी मिळावे याबाबत लेखी स्वरूपाचे निवेदन देण्यात आले. अन्यथा समितीचे वतीने कार्डधारकांच्या सहभागातून आंदोलनाचा ईशारा देखील देण्यात आला आहे.

आम्रपाली वसाहतीतील गोरगरीब, दलित, अल्पसंख्यांक पिवळे रेशन कार्डधारकांच्या विविध समस्यांबाबत तसेच रेशन दु.क्र.४३ गांधीनगर येथील दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याने, दुकानाची वेळ गैरसोयीची असल्याने सदरचे दुकानातील काहि कार्डधारकांनी दु.क्र.१६० ऊपनगर नासिक येथे स्वस्त धान्य दुकान बदलून मिळावे, धान्य दुकानदारांच्या मनमानी गैरव्यवहार- कारभाराबाबत आळा घालावा, अशिक्षित मोलमजूरी करणारे कार्डधारकांना संगणक प्रणालीच्या त्रासातून सोडवणूक करावी; अन्यथा या गैरकारभार विरोधात समितीचे वतीने आंदोलनाचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सदर निवेदन मा. येवलेकर मॅडम(धान्य वितरण अधिकारी कार्यालय नासिकरोड) यांनी स्विकारले. यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक अॅड.राहुल तुपलोढे, गणपतराव कटारे, सुनिता लोंढे, शेख आशाबी जमील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 निवेदनावर भागीरथी वारे, मो.ईस्माईल सैय्यद, इब्राहिम शेख गफूर, ससाणे माया सुकदेव, कौसाबाई किसन घोडे आदिंच्या  निवेदनावर स्वाक्षरी आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने