ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा तळोदा तर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.



तळोदा -ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा तळोदा तर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेठ के.डी.हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आय.आर.मगरे. तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा.आर.ओ.मगरे. तर प्रमुख वक्ते श्री प्रा.जयपालसिंह शिंदे होते.
तळोदा तालुका अध्यक्ष डॉ प्रा.एस.एन.शर्मा यांनी प्रास्ताविकात विवेकानंद ग्राहक पंचायतीचे आराध्य दैवत असून त्यांच्या विचारांना आदर्श मानतात.तर राजमाता जिजाऊंमुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र ाला मिळालेत.
अशी भावना व्यक्त केली.
प्रमुख वक्ते प्रा.जयपालसिंह शिंदे यांनी आपल्या भाषणात विवेकानंद विषयी शिकागो परिषद,जगातील उपाशी माणसाबद्दल चे विवेकानंदांचे तत्त्वज्ञान, तरूणांना दिलेला संदेश इ.सखोल माहिती स्पष्ट करतांना विविध विषयांना स्पर्श केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए.डी.सुर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन रमेशकुमार भाट यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पेन्शन असोसिएशन चे तळोदा अध्यक्ष यु.जी.पिंपरे. सहयोग ग्रुपचे अध्यक्ष अँड अल्पेशभाई जैन. तळोदा काँलेजचे माजी प्राचार्य डॉ एम.जी. पाटील. प्रवासी महासंघाचे सचिव पंडीत भामरे. के.जी.राजपूत सर ए.डी.सुर्यवंशी. तळोदा तालुकाध्यक्ष डॉ. प्रा.एस.एन. शर्मा,आय.आर.मगरे उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने