दोंडाईचा- येथील वि. जा. भ. ज. आश्रमशाळा येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक श्री साहेबराव पाटील होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. टी. एम. चित्ते व दोंडाईचा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील होते. व तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जनजागृत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष हितेंद्र भाऊ महाले व नगरसेविका सै. भावनाताई महाले व संस्थेचे माजी खजिनदार हेमंत महाले, सै. नंदाताई महाले, निलेश महाले होते. तसेच प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, माध्यमिक सलग्न एम आर एम कॉलेजचे प्राचार्य अरूण पाटील,सर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता माहत्मा गांधी, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक साहेबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलकर्णी यांनी केले व
आभार प्रदर्शन जितेंद्र गिरासे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले..
Tags
news