■■ मंदाणे येथे सेवानिवृत्त सैनिकांच्या उपस्थितीत हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन ◆◆ देशासाठी गांधीजींनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील- पं. स. सदस्या रोहिणीताई पवार



शहादा (प्रतिनिधी) :- शहादा तालुक्यातील मंदाणे येथील स्व. निलेश राजपूत बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचालित सरस्वती क्लासेस येथे हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांचा स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दि. ३० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून मंदाणे येथील सेवानिवृत्त सैनिक यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी निमित्ताने पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा पं. स. सदस्या रोहिणीताई पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सैनिक महेश्वर पाटील व मुकेश पवार उपस्थित होते.
                 भारतीय स्वातंत्र्य लढा अहिंसेच्या मार्गाने उभा करून ब्रिटिश राजवटी विरुद्ध महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याची चळवळ यशस्वी केली. देशासाठी गांधीजींनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांचे कार्य आणि विचार सतत मार्गदर्शक राहतील अशा शब्दात पं. स. सदस्या रोहिणीताई पवार यांनी आदरांजली वाहिली. त्याचसोबत सेवानिवृत्त सैनिक महेश्वर पाटील व प्रा. दिनेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
              राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारताला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक होते. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८ रोजी. महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. गांधी स्मृतीमध्ये नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी प्रार्थनेला जातांना गांधीजींवर गोळ्या झाडल्या त्या दिवशी महात्मा गांधी यांचे निधन झाले बापूंची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात येते.
              यावेळी मंदाणे गणातील पं. स. सदस्या रोहिणीताई पवार, सेवानिवृत्त सैनिक महेश्वर मनोहर पाटील, सेवानिवृत्त सैनिक मुकेश जयवंतराव पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रा. दिनेश पवार, संस्थेचे अध्यक्ष के. एस. राजपूत, संस्थेचे सचिव पी. आय. माळी, शिक्षिका अनिता मोरे, स्वाती सूर्यवंशी, अश्विनी बोरसे, वैशाली पाटील, दीपाली पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती सूर्यवंशी यांनी तर आभार के. एस. राजपूत यांनी व्यक्त केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने