*आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा वरवाडे येथे, 73 वा गणतंत्र दिवसाचा'ध्वजारोहण समारंभ संपन्न*





दी शिरपूर एज्युकेशन ट्रस्टच्या आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा वरवाडे,शिरपूर येथे 26 जानेवारी 'गणतंत्र दिवसानिमित्त  ध्वजारोहण समारंभ साजरा करण्यात आला,यावेळी माजी उपनगराध्यक्ष शि.व.न प.शिरपूरचे मोतीलाल दौलत माळी  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्रसिंग परदेशी, शि.व.न.प चे माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ डिंगबर माळी ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  विठ्ठल बोटकु पाटील,शिरपूर विविध सह. सोसायटी सदस्य दगा अर्जुन माळी ,अखिल भारतीय माळी महासंघ धुळे जिल्हा उपाध्यक्ष संतोष महारु माळी उपस्थित होते.शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.राष्ट्रगीत तसेच संविधान महत्त्व,संविधान प्रास्ताविकेतून या सुवर्ण दिवसाचे महत्त्व हजारो शहिदांच्या बलिदानातूनच उभे राहते.देशाचे  संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सुपूर्द करण्यात आले.प्रत्यक्ष २६ जानेवारी१९५० पासून ख-या अर्थाने देशाच्या कारोभारास सुरुवात झाली.आजच्या दिवसाचे महत्त्व आणि शहिदांच्या बलिदानास यावेळी अभिवादन करण्यात आले. ज्वाला मोरे यांनी सुत्रसंचालन केले.हंसराज पाटील, मनिषा पाटील,सुनील खैरनार,योगिता भामरे,तुळशीराम पावरा,विद्या बारी,राकेश शिरसाठ, दिपक गिरासे,दिनेश पावरा,चंदन माथने यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने