मराठी सिने,अभिनेत्री निर्मिती ताई सावंत वाढदिवस विशेष. (30 जाने, 2022) मुंबई- ( महाराष्ट्र ) लेखन :- सुनिल सोनार




  मराठी चित्रपट सृष्टीतील भरदार आवाज व आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती ताई यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने  लिहिलेला मी एक छोटा सा लेख. 
अत्यंत मन मिळाऊ तसेच साधेपणा अंगी असलेल्या आणि विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या निर्मिती ताई सांवत यांना चित्रपट सृष्टीत कोण नाही ओळखत, त्यांची अनेक मराठी विनोदी चित्रपट , नाटक, मालिका गाजलेले आहेत. 
तसेच लेखक ,निर्माते, राजेश देशपांडे सर यांनी लिहिलेले नाटक ( कुमारी गंगूबाई नाॅनमेट्रीक,जाऊ बाई जोरात,)( श्रीबाई समर्थ) लिखित नाटकात निर्मिती ताईच्यां प्रमुख भूमिका आहेत. 
मराठी चित्रपट -सासू नंबरी, जावाई दस नंबरी. 
कुमारी गंगूबाई मेट्रीक, चल धर पकड, खबरदार, असे अनेक विनोदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तसेच ताई स्वत: निर्माते हि आहेत, त्यांची बरेच मालिका गाजलेले आहेत. जाऊ बाई जोरात, श्री बाई समर्थ, कुमारी गंगूबाई , नुकताच प्रदर्शित झालेला मराठी पारिवारिक चित्रपट (झिम्मा) , 
नवीन नाटक  ( संजू छाया) या आधी पण बरेच नाटक त्यांची गाजलेली आहेत. 
फु बाई फू, किचन कलाकार, हास्य जत्रा शो तांईनी केले आहेत. 
  मुंबई येथील  राजेश देशपांडे सर यांच्या अभिनय कार्यशाळेत ,निर्मिती ताई सांवत  आम्हाला कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. बऱ्याच मनमोकळेपणाने त्यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यांचे शिरपूर येथील प्रसंगाचे वर्णन ही कार्यशाळेत कथन केले होते.तसेच त्यांना मी एक स्वलिखीत पुस्तक हि भेट स्वरूपात दिले होते. मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याने आपल्या मातीशी असणारे नाते कधीही विसरू नये. पैसा अडका  कितीही असला त्याला महत्त्व नाही. अशी मोठ्या मनाची कुठल्याही मोह, गर्व नसलेली मोठे मनाची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी निर्मिती ताई सांवत मराठी चित्रपट सृष्टीत लोकप्रिय आहेत , याचा सार्थ अभिमान आम्हास आहे.
भाषेत विनम्रता, कामात चोखपणा, अत्यंत सुरेख विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निर्मिती ताई सांवत यांना सृजन द क्रियेशन, ( राजेश देशपांडे )सर व माझ्या सुनील सोनार परिवार कडून, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.   💐💐🎂🎂🍰

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने