*आदिवासी शिक्षकाचा लढा सुरूच,उपोषणाचा 17 वा दिवस*




 दापोली  :जोपर्यंत दोषी व बोगस शिक्षण विस्तार अधिका-यांवर कारवाई होत नाही व मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषणापासून हटणार नाही, असे ठाम मत  उपोषणकर्ते जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे   शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त  केले आहे.विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व बोगस डिग्री धारक व दोषी श्री.नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणी साठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपल्या उपोषणाची तारीख वाढवून घेतली आहे.  दापोली येथे 17 व्या  दिवशीही उपोषण  सुरूच ठेवले आहे. 
             विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000/ रूपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,स्वत:कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे,जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर  प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी दापोली, मा.गटविकास अधिकारी गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 04/10/2018 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. त्यांच्या विरोधातल्या दिनांक 04/07/2018 व दिनांक 29/10/2018 रोजीच्या दोन्ही चौकशीत चौकशी समितीने विजय दाजी बाईत यांना दोषी ठरवले आहे. 
         नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार जिल्हा परिषद रत्नागिरी  यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
         माझ्या प्रकरणात जिल्हा परिषद रत्नागिरीला 2 लाख दंड ठोठावण्यात आला आहे. संबंधित  बोगस विस्तार अधिका-यांची चौकशी होऊन त्यांना  दोषी ठरविण्यात आले आहे. तरी जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासन हे बोगस विस्तार अधिका-यांना पाठीशी घालत आहे.जोपर्यंत बोगस विस्तार अधिका-यांवर कारवाई होऊन मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषणापासून हटणार नाही, असा निर्धार  उपोषणकर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासन सुशिलकुमार पावरा यांच्या उपोषणाची दखल घेते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने