शिरपूर - तालुक्यातील वाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांना अतिक्रमण करणे भोवले असून उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 4 सदस्य अपात्र घोषित करण्यात आले आहेत.याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक पटेल रा.वाडी बु।यांनी तक्रार दाखल केली होती.दाखल तक्रारीनुसार सरपंच व सदस्य यांनी अतिक्रमण केल्याने दोषी आढळून आल्याने सरपंच अनिता भरत भिल,सरपंच पती तथा सदस्य भरत दशरथ भिल सरस्वती शंकर पवार,आणि आशाबाई नाना ठाकरे यांचा समावेश आहे.
तालुक्यातील वाडी बु ग्रामपंचायत 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती दरम्यान तक्रारदार रज्जाक पटेल याने निवडून आलेल्या काही सदस्य व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अतिक्रमण केले असल्याची लेखी तक्रार गटविकास अधिकारी व जिल्हा अधिकारी यांचेकडे केली होती.दाखल तक्रारी नुसार पंचायत समितीचे,विस्तार अधिकारी,गटविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशी दरम्यान ग्रामपंचायत सरपंच,सरपंच पती व इतर दोन सदस्य यांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला होता.त्यानुसार धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी पाटील यांनी शिरपूर तालुक्यातील वाडी बु। ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता भरत भिल,सरपंच पती तथा सदस्य भरत दशरथ भिल सरस्वती शंकर पवार,आणि आशाबाई नाना ठाकरे याचे ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य पद अपात्र घोषित करीत सदस्य पद रद्द केले आहे. सदर प्रकरणात तक्रारदार यांच्या बाजूने कायदेशीर बाजू एडवोकेट शरीफ पटेल यांनी मांडली आहे व यात त्यांना यश आले असून सक्षमपणे कायदेशीर बाजू मांडल्यामुळे आरोपींवर कारवाई शक्य झाली आहे.
यापूर्वी देखील झाले आहे वाडी गावात अतिक्रमणावर कारवाई
यापूर्वी देखील वाडी गावात ग्रामपंचायत च्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले पक्के घर तक्रारदार रज्जाक पटेल यांच्या तक्रारीवरून अतिक्रमित घोषित करण्यात येऊन जमीनदोस्त करण्यात आले आहे .यासाठी तक्रारदार यांनी उच्च न्यायालयापर्यंत प्रकरण तडीस नेले होते व व न्यायालयाच्या आदेशाने सदरची अतिक्रमण हटविण्यात आले आहे.
तक्रारदार यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
विशेष म्हणजे सदर प्रकरणातील तक्रारदार रज्जाक पटेल यांनी वारंवार गावातील गैरव्यवहार बेकायदेशीर घरकुल अतिक्रमण बाबत शासन दरबारी तक्रारी केले आहेत याचा राग मनात ठेवून काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील करण्यात आला होता. याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे मात्र तरीदेखील तक्रार यांनी आरोपींच्या धमकीला भीक न घालता न्यायालयीन लढा सुरू ठेवला व त्यात त्यांना यश आले असून आता अतिक्रमण प्रकरणात सरपंचासह चार सदस्यांना आपले पद गमवावे लागले आहे.
Tags
news


