अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान आयोजीत नाताळ सणानिमित गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा आणि शालेय वस्तूंचे वाटप...!




'एक क्षण आनंदाचा' या उंक्ती प्रमाणे नाताळ सणाचे औचित्य साधून अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जोपासून गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावाखाली आपला आनंद गमावून बसणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्याना 
आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी तसेच आपले आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत हया उद्देशाने 
अक्षरा अपना स्कूल' पांजरपोळ, चेंबूर  मुंबई येथील भागांत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आनंद वाटणाऱ्या सांताक्लॉजचे प्रतीक असलेल्या दिवसानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय वस्तू भेटवस्तू म्हणुन प्रदान करण्यात आली. याप्रसंगी अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल वंजारे , दिग्दर्शक पत्रकार महेश्वर तेटांबे, समाज सेविका सौ विद्या विजय पाटील ,  समाजसेवक श्री. विजय पाटील , बालकलाकार मास्टर आर्य तेटांबे तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते. या उपक्रमास मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल वंजारे यांनी आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने