डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या. ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बिडीकामगारनगर , निलगिरी बाग ,या ठिकाणीअभिवादन , नाशिक शांताराम दुनबळे.





नाशिक= - आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५  वा महापरिनिर्वाण दिन असल्या निमित्ताने बिडी कामगार नगर ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आणि निलगिरी बाग औरंगाबाद रोड ,पंचवटी नाशिक येथे महामानवांना  धुप,दिप , वंदना घेऊन भावपूर्ण अभिवादन  अर्पण करण्यात आले . कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बिडीकामगार नगरचे नगरसेवक मा.सुरेशजी खेताडे ,आडगाव पोलीस स्टेशनचे एपीआय मा.तोडकर साहेब , जेष्ठ पत्रकार डॉ.राजेश साळुंके उपस्थित होते .  कार्यक्रमाचे आयोजन मा.सुरेशजी नेटावटे यांनी केले होते.
              महेंद्र पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले विचार आपल्या शब्दात जनतेला सांगितले .
 भाकरी पेक्षा स्वाभीमानाला महत्व दया"
                           डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
*"मी माझ्या आयुष्याची ५५ वर्षे जर*
सरकारी नोकरीत असतो, तर मला आता सेवानिवृत्ती होणे भागच पडले असते .परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव धेय्याखातीर बड्या पगाराच्या नोक-या नाकारल्या आहेत.
हे सांगत असतांना पुढे* बाबासाहेब म्हणाले,
*"इकॉनाॅमिक्स विषयातील परदेशातील पदवी घेऊन भारतात परतलेला मी केवळ*
*अनुसूचित जातीमधुनच नव्हे, तर*
संपूर्ण भारतातून पहिला होतो.
मुंबईत पाय टेकताच मुंबई सरकारने मला राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापकपद
स्वीकारण्याची विंनती केली. मी जर ती मान्य केली असती तर आज मला लठ्ठ पगार मिळाला असता.
पण मी ती नाकारली. कारण सरकारी नोकर व्हायचे म्हणजेआपल्या लोकांच्या उन्नतीसाठी काम करायच्या  इच्छेवर
स्वाभाविकच मर्यादा पडतात.
त्यानंतर पुन्हा मी पुढील शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेलो.तेथून पात्रता संपादन करून आल्यावर पुन्हा मला जिल्हा न्यायाधीशाचे
पद देऊ करण्यात आले. तीन वर्षात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमण्याचे आश्वासनही त्यासोबत दिलेले होते.
त्यावेळी मला धड शंभर रुपये हि मिळत नव्हते. अत्यंत गरीब लोकांसाठी बांधलेल्या चाळीतील एका खोलीत मी तेव्हा राहत होतो. तरीही मी तो देकार नाकारला.
जर मी ती नोकरी केली असती, तर सुखवस्तूपणाची हमी मिळाली असती. पण माझ्या सहबांधवांच्या कल्याणाचे व उन्नतीचे प्रयत्न करण्याचेमाझ्या आयुष्याचे ध्येय सफल
करण्याच्या मार्गात त्या नोकरीमुळे अडथळे उत्पन्न झाले असते. या एकाच करणाने मी नकार दिला.
१९४२ साली पुन्हा माझ्यासमोर एक पर्याय आला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी माझी नियुक्ती होऊ घातली होती. ती झाली असती तर मी आर्थिकदृष्ट्या तर श्रीमंत झालोच असतो, शिवाय दहा वर्षानंतरच्या सेवेनंतरमी सुखाची जिंदगी जगली असती पण माझ्या लहानपणापासून
जेव्हा मला आयुष्याचा अर्थ समजू लागला तेव्हापासून मी जीवनाचे एक तत्व सतत अनुसरत आलो. ते म्हणजे माझ्या समाज बांधवांची सेवा करण्याचे. एव्हढेच
दुस-या प्रश्नाकडे दिले नाही. माझ्या समाजाचे हितसंबंध मला सुरक्षित केलेच पाहिजेत. माझ्या आजवरच्या आयुष्याचे तेच ध्येय होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात जेंव्हा माझा मुलगा राजरत्न चा मृत्यु झाला होता, तेंव्हा कांही लोक माझ्याकडे येऊन यशवंतसाठी 'कफन' आणायला पैसे मागायला आले होते. पण माझ्याकडे स्वतःच्या मुलाला कफन विकत आणण्यापूरते सुध्दा पैसे नव्हते. शेवटी माझी पत्नी, रमाबाईने, आपल्या स्वतः च्या अंगावरील साडीचा एक पदर फाडून दिला आणि मग आम्ही यशवंतला त्यामध्ये गुंडाळून स्मशानात घेऊन गेले.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी जेवढी गरीबी अनुभवली आहे, तेवढी गरीबी कदाचित भारतातील एकाही नेत्याने अनुभवली नसेल*.
*मी गरीब असूनही कधी गरीबीचे कारण सांगून माझा स्वाभिमान व माझे आंदोलन कधीच कमी पडू* *दिले नाही*. *एवढी गरीबी असूनही मी पैशासाठी विकलो गेलो नाही आणि यापुढील आयुष्याचेही तेच ध्येय राहणार आहे आणि हेच ध्येय प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रत्येक रक्ताच्या माणसांसाठी काम करीतच रहावे*.
प्रत्येकाने आपल्या समोर एकच धेय बनवा आणि आपल्या बांधवाना एकत्रीत करा. कारण तुम्ही एकत्र आल्याशीवाय तुम्ही कोणालाही लढा देऊ शकत नाहीत. कारण एकीचे बळ हे कोणीही जगात मोडू शकत नाही. म्हणून खूप शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा.
गरीबीमुळे स्वाभिमान गहान टाकू नका.

*इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपयाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञाना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली,
शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!*
*यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे.*
*त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो !*
*हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले.अशाप्रकारे सर्व सविस्तर माहिती दिली.
        या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.सुनिल सुर्यवंशी, बौद्धाचार्य चारभे काका ,हरिदास भालेराव ,विजय साळवे ,संतोष पटेकर ,राजेंद्र वागळे, विजय शिरोडे ,विक्रांत ठोंबरे ,राजू पारवे, रमेश मुंढे, कमलाताई सरदार, प्रकाश सरदार , बाळू चोरमारे, संतोष पवार ,आनंद पटेकर, कैलास ठोंबरे, नाना चव्हाण तसेच परिसरातील सर्व नागरिक व उपस्थित होते. तसेच विश्वरत्न बहुउद्देशीय सेवा संस्था निलगिरी बाग येथील संतोष जी वाळवंटे, अनिल पटेकर ,अनिल मोरे, जयेंद्र पाडमुख ,गोडबोले इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश साळुंके यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेंद्र वागळे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने